Homeचिट चॅटरेल्वे कामगारांचे नेते...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. मुंबईतल्या आझाद मैदान येथे 3 जुलै रोजी चार कामगार कायदे मागे घ्या, या व इतर मागण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता.

रेल्वे कामगारांच्या बैठका घेऊन अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. अभ्यासू कामगार नेते असल्यामुळे वेतन आयोगामध्ये सातत्याने त्यांचा सक्रिय सहभाग होता. हिंद मजदूर सभेच्या अधिवेशन आणि कामगार प्रशिक्षण आयोजनामध्ये त्यांचा नियमित सहभाग होता. रेल्वे कामगारांमधील एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. कामगार चळवळीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. रेल्वे व्यवस्थापनासमोर कामगारांची बाजू ते नेहमी ठामपणे मांडायचे. त्यांच्या निधनाने रेल्वे कामगारांचे तसेच कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एका अभ्यासू कामगार नेत्याला कामगार चळवळ मुकली आहे, अशा शब्दांत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये आणि जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी गोदी कामगारांतर्फे श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content