Homeकल्चर +'जीव' आणि 'एप्रिल...

‘जीव’ आणि ‘एप्रिल मे ९९’ कान्स महोत्सवात!

फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म मार्केट’ विभागासाठी ‘जीव – द क्रिएचर’ आणि ‘एप्रिल मे ९९’ या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्यासपीठावर मराठी चित्रपटांची झालेली ही निवड राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारी ठरली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. हे महामंडळ राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असून, मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याचे काम करते.

कान्स महोत्सवातील ‘फिल्म मार्केट’ हा विभाग चित्रपट निर्माते, वितरक आणि जागतिक खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे निवड झाल्यामुळे या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय वितरण आणि प्रदर्शनासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या चित्रपटांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. तांत्रिक दर्जा आणि आशयसंपन्नता या निकषांवर हे चित्रपट पात्र ठरले आहेत. मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ मिळावी आणि मराठी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचावी, या उद्देशाने महामंडळ सातत्याने प्रयत्नशील असते. या निवडीबद्दल चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांकडून आनंद व्यक्त केला जात असून, आगामी काळात कान्समध्ये होणाऱ्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी सिनेमाचा दर्जा आणि विषयांची विविधता यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा डंका वाजणार आहे.

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content