ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच अंदाजात, सर्व स्तरातील लोकांसोबत मुंबईत अरबी समुद्रात, गेट वे ऑफ इंडियावर ताज पॅलेस हॉटेलसमोर एका बोटीवर नुकताच साजरा केला.
या वाढदिवस सोहळ्यात ‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेते विश्वजीत सोनी (ज्यांना बॉलिवूडमध्ये ज्युनियर प्रेम चोप्रा म्हणूनही ओळखले जाते.) सामाजिक कार्यकर्ते जमील चिश्ती, नासिर पठान, सी. व्ही. कुलकर्णी, अरुण वडनेरे, नितीन पाटील, प्रकाश दुपारगुडे, यशवंत मेंगजी, प्रद्युम्न थोरात, कण्णू यादव, रमाकांत मुंडे, गायक मंगेश कुमार, ॲड. यशवंत गंगावने, नृत्यांगना संगीता माने, राजाभाऊ, ॲड. अशोकानंद यादव आदी यावेळी उपस्थित होते.
के. रवि दादांनी याप्रसंगी सांगितले की, “मी नेहमीच नवीन गोष्टी आणण्याचा आणि रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आलो आहे. चेहऱ्यावर बनावटी हास्य आणण्यापेक्षा मी लोकांच्या चेहऱ्यावर खरी खुशाली आणि स्मितहास्य आणण्याचा सतत प्रयत्न करतो. बोटीवर बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणे हेदेखील सर्वांचे चेहरे आनंदाने भरण्याचे एक माध्यम आहे. मुंबई शहरात मी ‘लग्नाच्या बोटीत, लाटांच्या मस्तीत’ अशी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येत आहे, जिथे सर्व जाती-धर्मांचे विवाह मी चालत्या बोटीवर घडवून आणणार आहे.”

