Homeकल्चर +'वंदे मातरम'वर आधारित...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “व्हीएम फ्रेम्स” या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने व्यक्त करावयाचा आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला गेल्या वर्षी 150 वर्षे पूर्ण झाली. हा महत्वाचा टप्पा वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाद्वारे साजरा केला जात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जाणीवेत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मातृभूमीला ‘दैवी स्त्रीशक्ती’ मानत, या गीताने दिलेला संदेश स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आजही तो राष्ट्रभावनेतून उमटत आहे.

व्हीएम फ्रेम्स

‘व्हीएम फ्रेम्स’ चित्रपट निर्माते, कलाकार आणि नागरिकांना ‘वंदे मातरम’च्या तत्त्वज्ञानाचा समकालीन स्वरूपात पुनर्विचार करायचा आहे. ही स्पर्धा तीन श्रेणींमध्ये खुली आहे:

  • रील्स
  • एआय-आधारित चित्रपट
  • लघुपट

सहभागींना देशभक्ती, सांस्कृतिक ओळख, एकता आणि प्रगत ‘नव्या भारता’च्या दृष्टीकोनावर आधारित संकल्पनांवर व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पुरस्कार आणि मान्यता

रील्स

  • प्रथम पारितोषिक: ₹ 1,50,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 1,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 50,000

एआय चित्रपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 5,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹3,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 1,50,000

लघुपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 15,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 12,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 10,00,000

सहभागासाठी तपशील

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 7 मे 2026
  • अधिक माहिती: vande mataram150.in 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content