Homeपब्लिक फिगरसंरक्षण मंत्री राजनाथ...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ सरकारी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील सामरिक संरक्षण भागीदारी अधिक बळकट करण्याचा यामागील उद्देश आहे.

संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवणे, लष्करी संबंध अधिक दृढ करणे, सायबरसुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील संधीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण औद्योगिक सहकार्य आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील प्रशिक्षणासाठी सहकार्यासंबंधी अंमलबजावणी करारावर या दौऱ्यात सह्या होण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांचा आढावा घेण्याची, तसेच दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोगाचे नवीन पर्याय शोधण्याची संधी या भेटीमुळे उपलब्ध होईल. ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि सहउत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने, राजनाथ सिंह जर्मनीच्या संरक्षण उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधतील.

संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा सात वर्षांनी होत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2019 तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जर्मनीला भेट दिली होती. नंतर, बोरिस पिस्टोरियस यांनी जून 2023मध्ये भारतात येऊन राजनाथ सिंह यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. भारत आणि जर्मनी यांच्यात लोकशाहीची मूल्ये, कायद्याचे राज्य आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रती असलेली सामायिक वचनबद्धता यांवर आधारित धोरणात्मक भागीदारी आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता, स्थिरता व समृद्धीमध्ये योगदान देणे हा या भेटीचा उद्देश आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content