Homeचिट चॅटशालेय मुलांसाठी विनाशुल्क...

शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी उन्हाळी शिबीर

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात २५ एप्रिलपासून होणार आहे. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचादेखील यामागचा उद्द्येश आहे. माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, बीपीएड क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, एनआयएस कबड्डी प्रशिक्षक माधवी कदम व प्रॉमिस सैतवडेकर, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींचे यात शालेय खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे.

सदर शिबिरात निवड झालेल्या खेळाडूंना जास्तीतजास्त स्पर्धात्मक सराव देण्यात येणार असून होणाऱ्या चुकांचे परिमार्जनदेखील करण्यात येणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंचे संघ तयार करून विभागवार एक दिवसीय कबड्डी सामने उन्हाळी सुट्टीत खेळविले जाणार आहेत. तसेच गतवर्षाप्रमाणे पावसाळ्यात मोफत इनडोर कबड्डी उपक्रमसुद्धा राबविला जाणार आहे. यासाठी आत्माराम मोरे प्रतिष्ठान, आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, गौरी शंकर क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ, बाळ गोपाळ मंडळ, हनुमान क्रीडा मंडळ, ओम बजरंगबली क्रीडा मंडळ, यंग स्पोर्ट्स क्लब आदी संस्थांचे सेवाभावी सहकार्य लाभत आहे. सदर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ वर्षांखालील शालेय मुलांनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याशी संपर्क साधावा.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content