Homeचिट चॅटअजितदादांच्या स्मरणार्थ कबड्डी...

अजितदादांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धेत बालवीर स्पोर्ट्स, अंबिका सेवा विजेते

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईतल्या कर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळ, गौरीशंकर क्रीडा मंडळ आणि कुर्ला क्रीडा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित कुमार गट, प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि अंबिका सेवा मंडळाने जेतेपदाचा मान मिळवला. कुमार गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात बालवीर स्पोर्ट्स क्लब, चेंबूर यांनी जय भवानी क्रीडा मंडळ घाटकोपर यांचा‌ १४ गुणांनी सहज‌ पराभव केला. बालवीर स्पोर्ट्स क्लबकडून साई भोसलेने उत्कृष्ट पकडी केल्या तर रोहित सुनारने चौफेर चढाया करत आपल्या संघाला विजयी केले. जय भवानीचे तुषार कांबळे, श्रवण गायकवाड छान खेळले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहित सुनारला रोख रक्कम इंडक्शन गॅस व टि शर्ट देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट पक्कड म्हणून बालवीरच्या साई भोसलेला रोख रक्कम टि शर्ट व क्रॉम्प्टन कंपनीचा सिलिंग फॅन देऊन गौरवण्यात आले. जय भवानी क्रीडा मंडळाचा तुषार कांबळेला उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून रोख रक्कम टि शर्ट व क्रॉम्प्टन कंपनीचा मिक्सर देऊन गौरवण्यात आले.

प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिका सेवा मंडळाने वीर परशुराम क्रीडा मंडळ, घाटकोपरचा चुरशीच्या अंतिम लढतीत ९ गुणांनी पराभव केला. अंबिका सेवा मंडळाकडून शुभम दीडवाघने अष्टपैलू खेळ करत आपल्या संघाला विजयी केले. त्याला मानस जाधवने उत्कृष्ट चढाई करून तर योगेश जगदाळे व यश जगताप यांनी उत्कृष्ट पकडी करून सुरेख साथ दिली. वीर परशुरामकडून आदेश सावंत, वेदांत सावंत चमकले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम दीडवाघ त्यांना इंडक्शन गॅस रोख रक्कम टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट पक्कड म्हणून अंबिका सेवा मंडळाच्या यश जगतापला रोख रक्कम टी-शर्ट आणि क्रॉम्प्टन कंपनीचा पंखा भेट देण्यात आला तसेच उत्कृष्ट चढाईपट्टी म्हणून वीर परशुराम क्रीडा मंडळाच्या आदेश सावंतला रोख रक्कम क्रॉम्प्टनचा मिक्सर आणि टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.

त्याअगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुमार गटात बालवीरने भानवे अकॅडमीचा तर जय भवानीने महाड तालुका क्रीडा मंडळाचा पराभव केला. पुरुष विभागात अंबिकाने शूर जवानचा तर वीर परशुरामने सागरचा उपांत्य सामन्यात पराभव केला. या स्पर्धेसाठी शर्विल कदम या छोट्या खेळाडूने प्रत्येक पराभूत संघातील खेळाडूंना स्किपिंग रोपचे वाटप केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतीक गाढवे, कुर्ला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष, निलेश झंजे, उपाध्यक्ष, मनीष मोरे, गौरीशंकर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष,अमित कांबळे, प्रमुख मार्गदर्शक, विश्वास कांबळे, हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, कमलाकर बने, क्रीडाप्रमुख, अविनाश महाडिक यांनी भरपूर मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content