Homeएनसर्कलआखातातल्या गुगल, एप्पल...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित प्रमाणात मदत देऊ केली आहे. अनेक देशांनी तर अमेरिकेला त्यांचे हवाईक्षेत्र वापरण्यासही अनुमती नाकारली आहे. दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या अत्यंत तीव्र हल्ल्याला सामोरे जातानाच आखाती देशांतल्या अमेरिकेच्या १८ मोठमोठ्या कंपन्यांवर आज रात्री १० वाजल्यापासून हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. यात आयबीएम, एप्पल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेस्ला, इंटेल आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांनी कंपन्यांच्या एक किलोमीटर परिघापासून लांब राहवे, असे आवनाहनही इराणने केले आहे.

स्वतःचे तेल स्वतः वाचवा! – ट्रम्प यांचा मित्रराष्ट्रांना थेट ‘अल्टिमेटम’

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रदेशांच्या सुरक्षेबाबत अमेरिकेच्या भूमिकेत मोठी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत कठोर शब्दांत मित्रराष्ट्रांवर आगपाखड केली आहे. होर्मुजमधील स्वतःचे तेल स्वतः वाचवा, असा थेट अल्टिमेटम त्यांनी मित्रराष्ट्रांना दिला. युरोप आणि आशियाई देशांनी यापुढे अमेरिकेकडून तेलखरेदी करावी, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेकडे आता मुबलक प्रमाणात तेल आणि गॅससाठा आहे. त्यामुळे युरोप आणि आशियाई देशांनी इतर देशांवर अवलंबून न राहता थेट अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. “आम्ही तुम्हाला ऊर्जा सुरक्षा देऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला आमचे ग्राहक बनावे लागेल,” असा व्यापारी दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी आणि सुरक्षेचा मुद्दा

सर्वात धक्कादायक विधान त्यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत केले आहे. ट्रम्प म्हणाले की, “होर्मुजमधून जाणारे तेल चीन, जपान आणि युरोपचे असते. मग अमेरिकन नौदलाने तिथल्या जहाजांचे रक्षण का करावे? आमची मुले तिथे का मरावीत? जर तुम्हाला तिथून तेल हवे असेल, तर स्वतःच्या नौदलाच्या जोरावर ते घेऊन जा! अमेरिकेचा ‘फ्री सिक्युरिटी’चा काळ आता संपला आहे.”

“स्वतःसाठी लढायला शिका”

नाटो आणि इतर मित्रराष्ट्रांवर नाराजी व्यक्त करताना ट्रम्प यांनी ‘स्वतःसाठी लढायला शिका’ असा संदेश दिला आहे. मित्रराष्ट्रांनी आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करावी आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीवर अवलंबून राहू नये, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

इराण

नॉर्वेचा मोठा निर्णय: अमेरिकन विमानांना ‘नो एन्ट्री’

ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर युरोपमधून पहिली मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. उत्तर युरोपातील महत्त्वाचा देश आणि नाटोचा सदस्य असलेल्या नॉर्वेने आपल्या हवाई क्षेत्रात अमेरिकन विमानांच्या प्रवेशावर तत्काळ बंदी घातली आहे. नॉर्वेने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या हवाई क्षेत्रातून कोणत्याही अमेरिकन लष्करी किंवा टेहळणी विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नॉर्वेच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. रशियाशी असलेल्या सीमा आणि आर्क्टिक क्षेत्रातील वाढता तणाव पाहता, अमेरिकेच्या आक्रमक धोरणामुळे आपल्या देशाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नॉर्वेने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ‘एकतर्फी’ धोरणांविरुद्ध मित्रराष्ट्रांनी पुकारलेले एक प्रकारचे बंड असल्याचे बोलले जात आहे.

इराणची कोंडी आणि प्रत्युत्तर

अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे इराणची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. मात्र, इराणचे जनरल इब्राहिम जोलफाघारी यांनी इशारा दिला आहे की, “जर आमच्या तेल विहिरींना धक्का लागला, तर संपूर्ण जगाची ऊर्जा साखळी उद्ध्वस्त करू.” दुसरीकडे, इराणने चर्चेचा दावा फेटाळून लावला असला तरी, ट्रम्प यांच्या नव्या डेडलाईनकडे ते सकारात्मकतेने बघत असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे.

भारताचे ‘ऑपरेशन इव्हॅक्युएशन’

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाने तातडीने ३६ विशेष विमाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः दुबई आणि अबुधाबीमधील विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी असून, सुरक्षित प्रवासासाठी भारत सरकारने विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

जागतिक बाजारपेठेत अस्थिरता

होर्मुजमधील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे सुमारे ८०० ते १२०० रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ५ डॉलरची चढ-उतार पाहायला मिळत आहे. जर ६ एप्रिलपर्यंत तोडगा निघाला नाही, तर डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याचा धोका अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...
Skip to content