Homeन्यूज अँड व्ह्यूज22 वर्षांनंतर प्रथमच!...

22 वर्षांनंतर प्रथमच! तुम्ही बदलू शकता ‘जीमेल’ आयडी!!

जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा असलेल्या ‘जीमेल’मध्ये तब्बल 22 वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला आहे. ‘गुगल’ने आता वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यात (युझरनेम) बदल करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांसाठी “नवीन ईमेल अ‍ॅड्रेस” घेण्याची गरज किंवा संधी निर्माण झाली आहे.

काय आहे नेमका बदल?

2004मध्ये सुरू झाल्यापासून जीमेल वापरकर्त्यांना एकदा तयार केलेला ईमेल आयडी बदलता येत नव्हता. पण आता ‘गुगल’ने ही मर्यादा हटवली आहे.

  • आता तुम्ही “ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम” (@gmail.com) आधीचा तुमचा युझरनेम बदलू शकता
  • जुना ईमेल आयडी कायम राहील (अल्टरनेट म्हणून)
  • नवीन आणि जुन्या दोन्ही आयडीवर मेल मिळत राहतील

“नवीन ईमेल अ‍ॅड्रेस” का आवश्यक?

ही सुविधा आल्यामुळे अनेक कारणांमुळे नवीन ईमेल घेणे फायदेशीर ठरू शकते:

जुने/अनप्रोफेशनल नाव बदलण्याची गरज

अनेकांनी लहानपणी किंवा कॉलेजमध्ये बनवलेले मजेशीर ईमेल आयडी आज व्यावसायिक जीवनात अडथळा ठरतात. आता ते बदलून प्रोफेशनल आयडी घेता येणार आहे.

डिजिटल ओळख सुधारण्यासाठी

नोकरी, व्यवसाय, लिंक्डइन किंवा अधिकृत कामांसाठी योग्य ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.

नाव बदल, ब्रँडिंग किंवा करिअर बदल

लग्नानंतर नाव बदलणे, व्यवसाय सुरू करणे किंवा पर्सनल ब्रॅण्डिंगसाठी नवीन आयडी उपयोगी ठरू शकतो.

सुरक्षा कारणे

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, नवीन फीचरचा फायदा घेऊन फिशिंग हल्ले वाढू शकतात. त्यामुळे सुरक्षित आणि अपडेटेड ईमेल ठेवणे गरजेचे आहे.

बदल करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • वर्षातून फक्त एकदाच ईमेल बदलता येईल
  • काही ॲप्स/सेवा पुन्हा लॉगिन कराव्या लागू शकतात
  • सर्व डेटा (मेल, फोटो, ड्राइव्ह) सुरक्षित राहील

भारतात काय स्थिती?

सध्या ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू असून सुरुवातीला अमेरिकेत उपलब्ध आहे. लवकरच भारतासह इतर देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

‘गुगल’चा हा बदल जीमेल वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा आहे. “नवीन ईमेल अ‍ॅड्रेस घ्या” हा सल्ला आता बंधनकारक नसून एक संधी बनली आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची डिजिटल ओळख अधिक प्रोफेशनल, सुरक्षित आणि अद्ययावत करू शकता.

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आणि संगणकविषयक जाणकार आहेत.)

Continue reading

शिवसेना कोणाची? न्यायालयातला युक्तिवाद जसाच्या तसा…

शिवसेना, हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूकचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या आव्हानावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील...

शिवसेना पक्ष व चिन्हाचा वादः संपूर्ण युक्तिवाद जसाच्या तसा..

शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाकडे पुन्हा जाणार की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार यांच्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल या विषयावर बराच वेळ युक्तिवाद झाला. या कामकाजाचे हे इतिवृत्त... सर्वोच्च न्यायालयाचे...

मोदी सरकारला बसला ‘जेन-झी’ वादळाचा तडाखा!

भारताच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत जे घडले, ते केवळ अनपेक्षितच नव्हे तर अभूतपूर्व आहे. सलग १२ वर्षे देशावर एकछत्री आणि भक्कमपणे सत्ता गाजवणाऱ्या, 'अजेय' आणि 'बलाढ्य' मानल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला एका मुद्यावर सपशेल माघार घ्यावी लागली. आणि...
Skip to content