Homeपब्लिक फिगरशरद पवारांचे निकटचे...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता’ ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे काल सायंकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी मेघे, पुत्र माजी आमदार सागर मेघे, आमदार समीर मेघे, मुली स्मिता मेघे धारकर आणि संगीता मेघे ग्रोवर व सून देविका आणि वृंदा, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज पवनार येथे शासकीय इतमामाने होणार आहे.

आज दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी, पांडे लेआऊट खामला, नागपूर येथील निवासस्थानी राहणार आहे. दुपारी १ वाजता त्यांचे पार्थिव सावंगी मेघे येथे नेण्यात येईल. ०२.३० ते ०४.०० वाजेपर्यंत पार्थिव सावंगी (मेघे), वर्धा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. ०४.०० वा. त्यांची अंत्ययात्रा पवनार येथील त्यांच्या शेताकडे रवाना होईल आणि तेथे त्यांचे शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, आ. चरण ठाकूर, नाना पटोले, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती तसेच सामान्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने एक दूरदर्शी आणि जनतेसाठी झटणारा नेता हरपला आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

दत्ता मेघे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने केली होती. लहानपणापासूनच समाजकार्याची ओढ असल्याने त्यांनी आपल्या युवा अवस्थेतच युवक कॅडर नावाची संस्था स्थापन करून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे सुरु केले आणि विविध जनआंदोलनाचे सक्रिय नेतृत्त्व केले. शिक्षणासोबतच त्यांचे सामाजिक कार्य सुरु राहिले. बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एल.आई.सी.मध्ये डेव्हलपमेन्ट ऑफिसर म्हणून नोकरी सुरु केली. दरम्यान त्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीकडे बघता शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्त्वाचा गुण हेरून त्यांना दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतानाही आपल्या मंत्रिमंडळात १९७८मध्ये सरळ मंत्री म्हणून स्थान दिले. त्यानंतर मेघे तब्बल चार वेळा राज्यात मंत्री म्हणून राहिले. विधान परिषदेमध्येसुद्धा त्यांनी एकदा विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.

१९९१ मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतरची निवडणूक त्यांनी रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढवली व ते निवडून आले. त्यांच्या राजकीय करकीर्दीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. विदर्भात तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देत नागपूर, वर्धा तसेच संपूर्ण विदर्भात शाळा-महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. कुठलीही बाहेरील आर्थिक मदत न घेता त्यांनी अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केले. विदर्भात त्यांनी सहकारी बँक आणि सूतगिरण्या सुरु केल्या.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content