Homeन्यूज ॲट अ ग्लांसगोळीबारात थोडक्यात बचावले...

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी झाडली. मात्र, त्यांच्याभोवती असलेल्या सुरक्षारक्षकांपैकी एकाने चपळाईने आरोपीचा हात पकडला. त्यात ती गोळी निशाण्यावर न लागता दुसरीकडे गेली आणि डॉ. अब्दुल्ला थोडक्यात बचावले. यावेळी त्यांच्यापासून काही अंतरावरच जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरींदर कुमार चौधरीही होते. त्यांनाही या घटनेत कोणतीही इजा झाली नाही. घटनास्थळी पोलिसांनी लगेचच हल्लेखोराला ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत आसपासच्या लोकांनी हल्लेखोराला चांगला चोप दिला.

अब्दुल्ला

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपी जम्वाल जम्मूच्या पुरानी मंडी परिसरातला निवासी आहे. जम्मू अँण्ड काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचा तो सदस्य आहे. याच भागातून त्याने महापालिकेची निवडणूकही लढवली होती. याच परिसरात त्याची काही दुकाने आहेत. याच दुकानांच्या उत्पन्नावर त्याची गुजराण होते. कालच्या लग्नसमारंभात तोही सहभागी झाला होता. या समारंभात त्यांने यथेच्छ दारू ढोसली आणि दारूच्या नशेतच त्याने डॉ. फारूक अब्दुलांवर गोळी झाडली. यानंतर पोलीसठाण्यात जबानी देताना त्याने ही गोळी आपण आपल्या परवानाधारक पिस्तुलातून झाडल्याचे मान्य केले. गेली २० वर्षे आपण डॉ. अब्दुल्ला यांना ठार करण्याची संधी शोधत होतो. आज मला ती मिळाली. पण, त्यात डॉ. फारूक अब्दुल्ला बचावले. काही हरकत नाही. पुन्हा कधी संधी मिळेल, असे जम्वाल याने पोलिसांना सांगितले.

अब्दुल्ला

डॉ. फारूक अब्दुल्ला यांना झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेबरोबरच एसपीजी गार्ड्सची सुरक्षा आहे. असे असतानाही या सुरक्षाकवचाला भेदत आरोपी जम्वाल त्यांच्या जवळ पोहोचला. सरक्षारक्षकांचे कडे आणि सोबत असलेल्या वक्तींच्या गर्दीचा फायदा उचलत हल्लेखोराने डाव साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. दरम्यान, डॉ. अब्दुल्ला यांचे चिरंजीव, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यासाठी परमेश्वराचे आभार मानले आहेत. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, अल्लाह बडा रहमदिल है जिसके कारण मेरे पिता की जान बच गई… राज्यसभेत याचे पडसाद आज उमटले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी डॉ. फारूक अब्दुल्ला यांना सरकार मारू इच्छिते का, असा सवाल केला. दरम्यान, डॉ. अब्दुल्ला यांची तसेच त्यांच्या घराभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...
Skip to content