Homeन्यूज ॲट अ ग्लांसआखाती संघर्षातून अमेरिकेकडून...

आखाती संघर्षातून अमेरिकेकडून पॅकअपच्या हालचाली?

आखातात इराणने अमेरिका तसेच इस्त्रायला पूर्णपणे जेरीस आणल्यामुळे हताश झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्धातून पॅकअप करण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र दिसत आहे. आम्ही आमच्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचलो आहोत. इराणची अण्वस्त्रनिर्मिती ठिकाणे आम्ही उद्ध्वस्त केली आहेत. इराणचे नोदल, वायूदल जवळजवळ संपल्यात जमा आहे, असे सांगण्यास ट्रम्प यांनी सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला जगभरातून विरोध वाढत आहे. रशिया आणि चीनने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ब्रिटन तसेच स्पेनने अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांच्या या कृतीविरोधात अमेरिकेतच जनता रस्त्यावर उतरू लागल्याने युद्ध लांबवून अमेरिकेला खर्चात ढकलण्यापेक्षा युद्धातून सन्मानाने माघार घेण्यासाठी अमेरिकेने तयारी चालविल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आज युद्धाच्या पाचव्या दिवशीही इराणने आखाती राष्ट्रांतील युएई, कतर अशा राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले करत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले. काल रात्रीच इराणच्या असेम्ब्ली एक्स्पर्ट, या सर्वोच्च बॉडीने इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अमेरिकेच्या कारवाईत ठार झालेले आयातुल्लाह अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र मुस्तफा मोजतबा खामेनेई यांची नेमणूक केली. किरण हेगडे लाईव्हने खामेनेई यांच्या हत्त्येनंतर लगेचच दिलेल्या बातमीत ही माहिती दिली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. अमेरिकेसाठी हा मोठा धक्का मानला जातो. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याच्या भडिमारानंतरही खामेनेई यांच्या मुलाला त्यांचा उत्तराधिकारी नेमून इराणने आपण पुढेही लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिके

इराणमध्ये सत्तापालट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न पूर्णपणे विफल ठरला. तिथली जनता सध्याच्या इस्लामिक राजवटीसोबतच राहिली. याऊलट अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्याला तोंड देताना इराणने आखातातल्या १२ राष्ट्रांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच सीआयए, या गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयावर, दूतावासावर तीव्र हल्ले केले. या प्रयत्नात इराणने अमेरिकेची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असलेल्या कतर, सौदी अरेबिया, युएई अशा राष्ट्रांच्या महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले. याचा परिणाम आखाती राष्ट्रांमध्ये शिया-सुन्नी असा संघर्ष उभा राहिला आहे. इराण शिया मुस्लीमबहुल असलेला देश असून अरब राष्ट्रे सुन्नी मुस्लीमबहुल आहेत. हा संघर्षही अमेरिकेला पुढच्या काळात त्रासदायक ठरणार आहे. इराणकडून होत असलेल्या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता इराण इतक्यात शरणागती पत्करेल, असे नाही. त्यामुळेच अमेरिकेने आपल्या नागरिकांना ही आखाती राष्ट्रे सोडण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर काही दूतावासे बंद केली आहेत.

अफगाणिस्तान, इराकमध्ये सत्ता उलथवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेला लाखो डॉलरचा बोजा उचलावा लागला. आता इराणमध्ये परागंदा राजपुत्र रझा पेहलवी यांचे सरकार स्थापन करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. ते चांगले गृहस्थ आहेत, अशी टिपण्णी त्यांनी केली आहे. परंतु पेहलवी यांचा इराणच्या जनतेशी संबंधच उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे इराण सोपवणे अमेरिकेला शक्य होणार नाही. इराणमध्ये आता खामेनेईंचे पुत्र सर्वोच्च नेते झाल्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळेच अमेरिकेने आता इराणवर बी २ बॉम्बरने बॉम्ब टाकण्यास सुरूवात केली आहे. इराणमध्ये लष्कर घुसवण्याचाही इरादा त्यांनी जाहीर केला आहे. ट्रम्प यांनी लष्करी सामग्रीच्या उत्पादकांची तातडीने बैठक बोलावत त्यांना लवकरात लवकर जास्तीतजास्त उत्पादने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. इराणकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता. पण आता ती वेळ गेली आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिके

दरम्यान, दिवंगत इराणप्रमुख खामेनेई यांचे पार्थिव आज रात्री दहा वाजल्यापासून तीन दिवस अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार होते. परंतु अमेरिकेच्या वाढत्या हल्ल्यानंतर इराणच्या सरकारने हा निर्णय मागे घेतला. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर मश्शगत येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. इराणचे आताचे सर्वेसर्वा मोजतबा खामेनेई यांचे प्रतिनिधी अब्दुल माजीद यांनी अमेरिकेबरोबर सन्मानाने चर्चा होणार असेल तर चर्चेची तयारी दाखवली असली तरी स्वतः खामेनेई यांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अरागची यांनी अमेरिकेने केलेला हल्ला ट्रम्प यांच्या हट्टापायी झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये चाललेली चर्चा एखाद्या रियल इस्टेच्या डीलप्रमाणे मानून ट्रम्प यांनी बॉम्बहल्ले सुरू केले असेही ते म्हणाले. चिनी संरक्षणप्रणाली फेल ठरल्याने आम्ही मार खातोय, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...

अवघ्या ३ महिन्यांतच नितीश कुमार यांचा बिहारला बायबाय?

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. येत्या १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांचे पुत्र निशांत कुमार बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील...

आखाती युद्धामुळे देशात यंदा हापूस स्वस्त?

आखातात इराण, अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धामुळे यंदा आंबा निर्यातीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता असून त्यामुळे देशात यंदा हापूस स्वस्तात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाईमार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही...
Skip to content