Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान मोदींनी घेतला...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी तडका देण्यात आला होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश असलेल्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासाठी लोकभवनातर्फे वडापाव तसेच मिसळपाव यांचा समावेश असलेली न्याहारी ठेवण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांचे भरडधान्याला (मिलेट्स मिशन) प्रोत्साहन देण्याचे धोरण विचारात घेऊन पंतप्रधान व त्यांच्या टीमच्या न्याहारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील डोमगावचा नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्वारीचा हुरडा ठेवण्यात आला होता.

हुरड्याव्यातिरिक्त डहाणू येथील नैसर्गिकरित्या तयार झालेले चिकूदेखील डेझर्ट म्हणून ठेवण्यात आले होते. पालघर जिल्यातील चवदार जामदेखील होते. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठाकपुर्ली येथील बर्फीदेखील पंतप्रधानांसाठी ठेवण्यात आली होती. या बर्फीमध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरण्यात येत नाही. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनादेखील मुंबईचा वडापाव खूप आवडला. महाराष्ट्राच्या या अस्सल मराठी पदार्थांचा आनंद पंतप्रधानांसह त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळानेदेखील घेतला.

 

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content