Homeकल्चर +मोहना कारखानीस यांच्या...

मोहना कारखानीस यांच्या साहित्यकृतींवर रंगला परिसंवाद

सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या ‘टेक ऑफ’ (कथासंग्रह), ‘चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित ‘पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा प्रत्यय देत असतात, असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

परिसंवादात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर देवेंद्र भुजबळ, गौरी कुलकर्णी, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, अशोक मुळे (डिंपल प्रकाशन), लता गुठे (भरारी प्रकाशन) यांनी भाग घेतला. यावेळी त्यांच्या ‘टेक ऑफ’ कथेचे अभिवाचन गौरी कुलकर्णी यांनी केले. यानंतरच्या सत्रात ‘गोवा आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रिया बापट यांनी आपले विचार व्यक्त केले. अखेरच्या सत्रात निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन झाले. यात गौरी कुलकर्णी, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ, संगीता अरबुने, लता गुठे, ज्योती कपिले, फरझाना इक्बाल, मेघना साने, कविता मोरवणकर यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी भोईर यांनी केले.

मोहना कारखानीस यांची तिन्ही पुस्तके यापूर्वी सिंगापूर येथे साहित्यव्रती आशा बगे यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content