Homeबॅक पेजमनोरा बॅडमिंटनः सात्रा,...

मनोरा बॅडमिंटनः सात्रा, राजपूत, साळुंखे, डेनिस, चांडक, देसाई, गावडे, सामंत विजेते

मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने नुकत्याच खार जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ११८व्या बॅडमिंटन स्पर्धेत पेहेर सात्रा, साऊजा राजपूत, आरोही साळुंखे, निवान डेनिस, अर्णा चांडक, अजिंक्य देसाई, रुद्रा गावडे, साईराज सामंत यांनी आपापल्या गटात विजेतेपदाचा मान मिळवला. राज्याच्या विविध भागातील २००पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. योनेक्सचे सहकार्य या स्पर्धेला लाभले होते. खार जिमखान्याचे अध्यक्ष गौरव कापाडिया, बॅडमिंटन विभागाचे चेअरमन भरत पारेख, सचिव देवांग दवे, आदित्य गोगटे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. मनोरा बॅडमिंटन अकादमीचे संचालक मनोहर गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली.

स्पर्धेचा अंतिम निकाल

मुली

९ वर्षांखालील- पेहेर सात्रा वि. वि. जुई सुखटणकर, ११ वर्षांखालील- आरोही साळुंखे वि.वि. काव्या कुमारी, १३ वर्षांखालील- अर्णा चांडक वि.वि. श्रावणी खैरनार, १५ वर्षांखालील- रुद्रा गावडे वि.वि. जागृती जाधव.

मुले

९ वर्षांखालील- साऊजा राजपूत वि.वि. जेहान चोक्सी, ११ वर्षांखालील- निवान डेनिस वि.वि. तनय पारेख, १३ वर्षांखालील- अजिंक्य देसाई वि.वि. अद्वय आढाव, १५ वर्षांखालील- साईराज सामंत वि.वि. हेमांशू भाटकर.

दिव्यांग, गतिमंद,अंध , पॅरा पाॅवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे दिव्यांग, गतिमंद, अंध, पॅरा पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस स्पर्धा नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार व पॉवरलिफ्टर कॅ. तमिल सेलवन यांच्या हस्ते झाला. बक्षीस समारंभ संजय बाबुराव शेट्ये, सरचिटणीस महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, संजय सरदेसाई, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे-

बौद्धिक अक्षम (गतिमंद)– ५३ किलो- १) सौरभ पाटील- सांगली- सुवर्ण, २) इश्कवाकू वशिष्ठ- ठाणे- रौप्य. ५९ किलो- १) रंगम मुजुमदार- मुंबई उपनगर, २) ध्रुव बुद्धदेव- ठाणे. ६६ किलो- १) समर्पित शिंदे- कोल्हापूर, २) अधीरय राव- मुंबई उपनगर, ३) प्रिन्स चतुर्वेदी- ठाणे. ७४ किलो- १) सोहम गवारे- ठाणे, २) ऋषभ जैन- पालघर, ३) यश पंगत- रायगड. ८३ किलो- १) निलेश विजयसिंग- मुंबई उपनगर. ९३ किलो- १) कुणाल पावसकर- मुंबई. महिला गट ४३ किलो- शुक्ला बिडकर- कोल्हापूर.

पॅरा पॉवरलिफ्टिंग (अपंग)- ५३ किलो- १)जितेश सासेकर- रायगड, २) मयूर भाटणकर- कोल्हापूर. ५९ किलो- १) साई किरण- मुंबई, २) विवेक कांबळे- कोल्हापूर, ३) अक्षय पाटील- कोल्हापूर. ६६ किलो- १) कृष्णा आरगडे- सांगली, २) अवधूत सकपाळ- कोल्हापूर, ३) विशाल पाटील- मुंबई, ४) हरीश अल्हात- पुणे. ८३ किलो- १) प्रवीण जगताप- रायगड, २) जयपाल राजाराम- पुणे, ३) सुनील लहाने- परभणी. ९३ किलो- १) दिनेश झा- मुंबई, २) प्रकाश गजरा- पालघर.

दिव्यांग (अंध) पॉवरलिफ्टिंग- ५३ किलो- १) साईप्रसाद जाधव- कोल्हापूर. ६६ किलो- १) हरीश खरात- मुंबई. ९३ किलो- १) दर्शन कांबळे- मुंबई, २) रावसाहेब धरणे- परभणी, ३) आदित्य गायकवाड- मुंबई उपनगर. १०५ किलो- १) उदय भंडारी- नवी मुंबई. महिला गट- ५२ किलो- १) कृष्णा पवार- सातारा, ७६ किलो- १) कल्याणी बागडे- नागपूर.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहा पावसकर, अध्यक्ष, पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र, पंकज चौधरी, सचिव पॅरा ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र, भास्कर सावंत, मैदान बचाव समिती व विश्वस्त ज्ञानेश्वर विद्यालय, संजय माधव, बाबू खोत व सूर्यकांत गर्दे यांचे मोलाचे सहकार्य‌ मिळाले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content