Homeकल्चर +१९ सप्टेेंबरपासून संपूर्ण...

१९ सप्टेेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’!

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे. अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीतदिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल इंटरटेनमेंट काम पाहणार आहे.

काही वर्षांत गावातल्या मुलांची लग्न जमणे ही एक समस्याच झाली आहे. याच संकल्पनेचा वेध Isl “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी असणारी कहाणीच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. धमाल गोष्टीला मालवणी भाषेचा तडकाही आहे. प्रत्येकाचं मनोरंजन करणारी आणि प्रत्येक घराला रिलेट होणारी ही गोष्ट आहे. म्हणूनच नावापासून कुतूहल निर्माण करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सारे उत्सुक असतील यात शंका नाही.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content