Homeएनसर्कलऑलिम्पिक चॅम्पियन नीरज...

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आता ऑडी इंडियासोबत!

दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा याने जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा करताना जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्सने सांगितले की, कामगिरी, अचूकता आणि प्रगतीशील मानसिकतेने प्रेरित दोन प्रमुखांना एकत्र आणणारा हा प्रबळ सहयोग आहे. चोप्राने टोकियो ऑलिम्पिक गेम्‍समध्‍ये ऐतिहासिक भालाफेकीसह संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्‍याने आता अभियांत्रिकी सर्वोत्तमता, अविरत नाविन्‍यता आणि दूरगामी डिझाइनसाठी जागतिक स्‍तरावर प्रसिद्ध ब्रँड ऑडी इंडियासोबत सहयोग केला आहे. हा सहयोग अॅथलीट आणि ब्रँड यांच्‍यामधील जागतिक दर्जााची कामगिरी, वेगवान गती आणि प्रतिष्ठित दर्जा या समान मूल्‍यांना प्रशंसित करतो.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्हणाले की, ऑडीमध्‍ये आम्‍ही मर्यादांना दूर करणाऱ्या, फक्‍त कामगिरीने नाही तर सर्वोत्तमतेचा निरंतर प्रयत्‍न करणाऱ्या व्‍यक्‍तींना पाठिंबा देतो. नीरज चोप्रामधून तो उत्‍साह दिसून येतो. निश्‍चयी व आयकॉनिक असलेल्‍या त्‍याच्‍या महत्त्वाकांक्षेपासून यश संपादित करण्‍यापर्यंतच्‍या प्रवासामधून ऑडीचा प्रगतीशील डीएनए दिसून येतो. त्‍याचा फोकस, गती आणि अद्वितीय कामगिरी त्‍यांना आमच्‍या ब्रँडचे नैसर्गिक विस्‍तारीकरण बनवतो, जेथे ब्रँड फॉलो करण्‍यासाठी नाही तर नेतृत्त्‍व करण्‍याचे प्रतीक आहे.

नीरज चोप्रा या सहयोगाबाबत म्‍हणाला की, मी नेहमी फक्‍त कार्ससाठी नाही तर ब्रँडच्‍या दर्जासाठी ऑडीची प्रशंसा केली आहे. अॅथलीट असल्‍याने ही मूल्‍ये माझ्याशी संलग्‍न आहेत. मैदानावर असो किंवा जीवनाचा सामना करायचा असो सर्वोत्तमतेसाठी प्रयत्‍न कधीच थांबत नाहीत. मला ऑडी कुटुंबामध्‍ये सामील होण्‍याचा आणि करणाऱ्या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये पुढे जाण्‍यास प्रेरित करणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्‍व करण्‍याचा आनंद होत आहे.

टेक्निकसाठी ओळखला जाणारा नीरजमधून ऑडीचे मूलभूत पैलू दिसून येतात- अचूकता, निश्‍चय आणि मर्यादांना दूर करण्‍याची महत्त्वाकांक्षा. रेसट्रॅकपासून रनवेपर्यंत आणि क्रीडाक्षेत्रापासून जागतिक मंचापर्यंत या सहयोगामधून सर्वोत्तमतेसाठी समान दृष्टिकोन निदर्शनास येतो. एशियन गेम्‍स, कॉमनवेल्‍थ गेम्‍स आणि वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये अव्वल स्थान मिळवून ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाारा नीरजने नंतर २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले.

जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्समध्‍ये आम्‍हा सर्वांना नीरज चोप्रा आणि ऑडी इंडिया यांच्‍यामधील या सहयोगाचा आनंद होत आहे, जो भारतीय क्रीडा व व्‍यवसायासाठी महत्त्वपूर्ण सहयोग आहे. ऑडी कार उत्‍पादक आहे, जिची नीरज मनापासून प्रशंसा करतो आणि ब्रँड म्‍हणून कंपनीचा दृष्टिकोन अॅथलीट म्‍हणून त्‍याच्‍या पैलूंशी नेहमी संलग्‍न आहे. ऑडीसोबतच्‍या आमच्‍या सर्व चर्चा सकारात्‍मक राहिल्‍या आहेत आणि नीरज भारतातील सर्वोत्तम अॅथलीट असण्‍यासह माझा विश्‍वास आहे की, या सहयोगाची क्षमता अमर्यादित आहे,” असे जेएसडब्‍ल्‍यू स्‍पोर्ट्सचे चीफ कमर्शियल ऑफिसर करण यादव म्‍हणाले.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content