Homeकल्चर +भूषण मंजुळे यांची...

भूषण मंजुळे यांची नवी इनिंग!

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे आता “सुधा – विजय १९४२” ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीजर, पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

वरुणराज मोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य अनुभव ठरणार आहे. सैराट, घर बंदूक बिर्याणी, झुंड, फँड्री यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय व कास्टिंगसाठी ओळखले जाणारे भूषण मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते म्हणून पुढे आले आहेत. या चित्रपटाची निर्मिती शिव लोखंडे आणि सरिता मंजुळे यांनी केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कथानिवडी आणि दर्जेदार सिनेमा निर्मितीमुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. हा चित्रपट रुमीर प्रॉडक्शन आणि व्ही स्क्वेअर एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने तयार होत आहे.

मंजुळे बंधू त्यांच्या परिपूर्ण कास्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण असतील यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. भूषण यांनी यापूर्वीही नव्या कलाकारांना मोठ्या संधी दिल्या आहेत. “सुधा – विजय १९४२” या शीर्षकावरूनच कळते की हा चित्रपट १९४२ सालात घडतो. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची आणि त्याच्या अढळ प्रेमकथेची हृदयस्पर्शी कहाणी सांगतो. या पोस्टरमध्ये त्या काळाची झलक आणि चित्रपटातील भावनिक गुंतवणूक दिसून येते. आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content