Homeमुंबई स्पेशलमुंबईत ईदची सुट्टी...

मुंबईत ईदची सुट्टी १८ तारखेला!

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद, हा मुस्लिमधर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी, हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुस्लिमधर्मियांनी केली होती.

या मागणीचा विचार करून शासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर केली आहे. तशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिमधर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content