Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः संगीता, अमोल उपान्त्य फेरीत 

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संगीता चांदोरकरने आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबईच्याच मिताली पाठकवर सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांमध्ये उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या अमोल सावर्डेकरने पुण्याच्या रहिम खानवर अटीतटीच्या लढतीत पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१५, २५-६ असा जिंकून विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल असेः

महम्मद घुफ्रान (मुंबई) वि वि सौरभ मते (मुंबई)

प्रशांत मोरे (मुंबई) वि वि पंकज पवार (मुंबई)

विकास धारिया (मुंबई) वि वि समीर अंसारी (ठाणे)

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल असेः

आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि वि काजल कुमारी (मुंबई)

नीलम घोडके (मुंबई) वि वि अंबिका हरिथ (मुंबई)

रिंकी कुमारी (मुंबई) वि वि केशर निर्गुण (सिंधुदूर्ग)

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content