Homeन्यूज अँड व्ह्यूज१ सप्टेंबरपासून चिपी...

१ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दरदिवशी विमानसेवा

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदूर्ग ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदूर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच खऱ्या अर्थाने कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला आहे.

चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदूर्ग व सिंधुदूर्ग ते मुंबई अशी विमानप्रवास सेवा सुरू झाली होती. परंतु कालांतराने ही विमानसेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासियांचे तसेच मुंबईकरांचे नेहमीच खूप हाल होत होते. या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची भेट दिल्ली येथे भेट घेतली. त्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरू करण्याची विनंती चव्हाण यांनी या बैठकीत केली. त्यानुसार येत्या १ सप्टेंबरपासून मुंबई ते सिंधुदूर्ग व सिंधुदूर्ग ते मुंबई ही प्रवासी विमानसेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरू करण्यात येईल. तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरू असेल. एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांमार्फत ही विमानसेवा सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील.

चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती व त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन केल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या विषयामध्ये प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. 

आयआरबीने विमान प्राधिकारणाकडून करावयाच्या ज्या आवश्यक पूर्तता येत्या ४ दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची अशी ग्वाही आयआरबीच्या वतीने विरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी व एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली. नवी दिल्ली येथे बैठकीला उपस्थित केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, विशेष कार्य अधिकारी, संयुक्त सचिव, एअर इंडिगो, एअर इंडिया, एअर अलास्का आयआरबीचे किरण कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content