Homeटॉप स्टोरीआता फळे, भाजीपालाही...

आता फळे, भाजीपालाही ११ वाजेपर्यंतच!

राज्यातील सर्व किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिशसह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने येत्या १ मेपर्यंत दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. मात्र, या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन तेथील परिस्थिती पाहून या वेळेत बदल करू शकेल, असे आज राज्य सरकारने जाहीर केले.

राज्य सरकारने आज याबाबतची नवी नियमावली जाहीर केली. नव्या नियमानुसार असे असणार विविध उद्योग..

१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११

३) भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

५) अंडी, मटण, चिकन, मासे विक्री सकाळी ७ ते ११

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११

७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११

८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११

९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार

याशिवाय पूर्वीच्या आदेशांनुसार पुढील बाबी कायम असतील.

* हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांची होम डिलिव्हरी चालू राहील.

* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.

* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.

* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.

* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.

* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.

* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.

* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.

* विवाह समारंभास बंदी राहील.

* चहाची टपरी, दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* सिनेमाहॉल, नाट्य गृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.

* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

* व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/इव्हनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content