Homeबॅक पेजअर्धवट शिक्षण सोडणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी...

अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी ‘नयी मंझिल’!

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 8 ऑगस्ट 2015 रोजी जागतिक बँकेकडून 50% निधीसह नयी मंझिल नावाची केंद्रीय क्षेत्र योजना (सीएसएस) सुरू केली. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा औपचारिक दाखला नाही अशा अल्पसंख्याक युवकांना म्हणजे, शाळा मध्येच सोडलेल्या किंवा मदरशासारख्या समाज शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांना याचा लाभ मिळावा हा यामागचा उद्देश आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारने अल्पसंख्याक, विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी विशेषाधिकारप्राप्त घटकांसह प्रत्येक स्तराच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सहा (6) केंद्रीय अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी देशभरात विविध योजना राबवते. या योजनेने औपचारिक शिक्षण (इयत्ता आठवी किंवा दहावी) बरोबरच कौशल्य शिक्षण देखील प्रदान केले आणि लाभार्थ्यांना उत्तम रोजगार आणि उपजीविका मिळवण्यासाठी सक्षम बनवले.

एकूण 1,00,000 च्या उद्दिष्टापैकी, 99,980 लाभार्थ्यांची मंत्रालयाने निवड केली, त्यापैकी 98,712 लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि यासाठी आतापर्यंत एकूण 456.19 कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना जारी केलेल्या निधीसह लाभार्थ्यांचे राज्यनिहाय /लिंगनिहाय तपशील मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  www.minorityaffairs.gov.in उपलब्ध आहेत.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content