Homeटॉप स्टोरीस्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे...

स्थलांतरीतांच्या भरवशावर लॉकडाऊनचे भवितव्य?

राज्यातल्या वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी लॉकडाऊन लावणे अपरिहार्य असले तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्तीतजास्त स्थलांतरीत वर्ग आपापल्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा राज्याच्या विविध शहरांमध्ये राज्यातील, परराज्यांतील कामगार, मजूर मोठ्या प्रमाणात राहतो. मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हा वर्ग जे हाती लागेल ते घेऊन आपापल्या गावी निघाला होता. त्यावेळी रेल्वेसुद्धा बंद होती आणि रस्त्यावरून एसटीही धावत नव्हत्या. रोजगार बुडाल्याने त्यांना आपले घर गाठण्याशिवाय पर्यायही नव्हता. मात्र, जसजसा लॉकडाऊन सैल झाला तसतसा हा वर्ग पुन्हा आपल्या रोजगारासाठी शहरांमध्ये विसावला. आता कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी आणि विविध निर्बंध लावण्यात आले असले तरी रेल्वे आणि बस ही प्रवासाची अत्यंत महत्त्वाची साधने सुरू आहेत.

मागच्या खेपेला तासनतास पायपीट करणाऱ्या या मजुरांना केंद्र सरकारने विविध मार्गाने मदत केली होती. राज्य सरकारकडे याकरीता अन्नधान्य दिले होते. राज्याला विविध पॅकेजद्वारे मदतही मिळाली होती. त्याखेरीज विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, यावेळी अशी कोणतीही मदत दृष्टीक्षेपात दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर या लोकांसाठी करावा लागणारा खर्च शासनालाच सोसावा लागणार आहे. ही शक्यता ध्यानात घेऊन गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्याचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्तीतजास्त मजूर, कामगार आपापल्या कुटुंबासह आपापल्या मुक्कामी पोहोचेल आणि नंतर त्यांना पोहोचविण्याची जबाबदारी सरकारला उचलावी लागणार नाही, असा हा सारा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासाठी बनविलेल्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सशीही दोनवेळा दीर्घ चर्चा केली. या चर्चेत त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किमान १५ ते २१ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा अशी शिफारस केली आहे. कोरोनामुळे वर्षभर भरडलेल्या लोकांनी लॉकडाऊनला केलेला विरोध आणि भारतीय जनता पार्टीने या वर्गाला दिलेला पाठिंबा लक्षात घेता आणि राज्याची डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था पाहता या लोकांसाठी कोणते पॅकेज जाहीर करता येईल, याची आखणी राज्य सरकार करत असल्याचे कळते.

Continue reading

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...
Skip to content