Homeएनसर्कलसोमवारपासून दुकाने सुरू...

सोमवारपासून दुकाने सुरू होणार?

ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री व सरकार सकारात्मक असून त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत आजपासून म्हणजेच ९ एप्रिलपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव कालच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर तर्फे ८ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी “ब्रेक द चेन व व्यापार बंद” या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग आयोजित करण्यात आली. त्यात मंडलेचा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत २ दिवस वाट बघण्याच्या आवाहनावर मते मांडण्याचे आवाहन केले. ललित गांधी यांनीही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचा आढावा घेतला. त्यात सोमवारपासून दुकाने सुरू करण्याबाबत ठरविण्यात आले.

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलीका, पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष कमलेश धूत, पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, चंद्रपूर जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष रामजीवन परमार, नाशिक घाऊक व्यापारी किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, मोहन गुरुनानी, नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे कैलाश चावला, हर्षवर्धन संघवी, सिंधुदूर्ग व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, सुरेश पाटील, सांगली, संगमनेर असोसिएशनचे ओंकारनाथ भंडारी, टिम्बर फेडरेशन, जळगाव व्यापारी महासंघ, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, स्टील चेंबर, सिमेंट स्टोकिस्ट असोसिएशन, तुर्भे व्यापारी असोसिएशन, पालघर, वसई, तारापूर  असोसिएशन, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, व्हीटीपी असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शाह, चिपळूण इंडस्ट्री असोसिएशन अध्यक्ष अविनाश अशोक, अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीऱ्यांनी बैठकीत सहभाग नोंदवत सोमवारपर्यंत दुकाने सुरू न करण्याचे मत नोंदवले.

बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, अजित सुराणा, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता आदीसह ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content