Homeटॉप स्टोरीकर्जफेडीसाठी १६ हजार...

कर्जफेडीसाठी १६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा घाट!

सोमवारपासून मुंबईत सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या मार्च, २०२१च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, सरकारकडून वर्ष २०२०-२१साठी शेवटच्या रु. २१,०७६ कोटींच्या पूरक मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. वित्त विभागाने यातील रु. १६,२०० कोटी इतकी पूरक मागणी देशांतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केली आहे. एकूण रु. २१,०,७६ कोटी पूरक मागणीच्या प्रमाणात ही रक्कम ७६.८६% आहे. याचा अर्थ केवळ कर्जफेड करण्यासाठी शासनाने या पूरक मागण्या केल्या आहेत असे दिसते.

समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्राने हा निष्कर्ष काढला आहे. वर्ष २०२०-२१मधील पूरक मागण्यांची एकूण रक्कम रु. ७२,१५२ कोटी झाली आहे. मूळ अर्थसंकल्पात (रु. ४,३४,०८४ कोटी) पूरक मागण्यांचे (रु. ७२,१५२ कोटी) प्रमाण १७.८८% झाले आहे. वर्ष २०२०-२१चा मूळ अर्थसंकल्प रु. ४,३४,०८४ कोटींचा होता. त्यात रु. ७२,१५२ कोटींची भर पडली असून एकूण अर्थसंकल्प रु. ५,०६, २३६ कोटींचा झाला आहे. एकूण अर्थसंकल्पात पूरक मागण्यांचे प्रमाण १०%पेक्षा जास्त असू नये असा अर्थसंकल्पीय दंडक असताना वर्षभरातल्या पूरक मागण्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत १७.८८% इतक्या करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मार्च, २०२१मध्ये सादर झालेल्या रु. २१,०७६ कोटींच्या पूरक मागण्यांमध्ये वित्त विभागाने सर्वात जास्त म्हणजे रु. १८,०५० कोटींच्या (८९.४३%) पूरक मागण्या सादर केल्या आहेत. वित्त विभागाचा पूरक मागण्या सादर करण्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल. सर्वात जास्त पूरक मागण्या सादर करणारे ५ विभाग ज्यांनी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पूरक मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्वात पुढे वित्त विभाग- रु. १८,८५०.६० कोटी (८९.४३%), नगर विकास विभाग- रु. ८२६.६८ कोटी (३.९०%), उद्योग उर्जा व कामगार विभाग- रु. ५७६.५२ कोटी (२.७३%), जलसंपदा विभाग- रु. ४८७.५५ कोटी (२.३१%), महसूल विभाग- रु. २४४.०६ कोटी (१.१५%) एवढ्या पूरक मागण्या सादर केल्या आहेत. या ५ विभागांची एकूण रक्कम रु. २०,९८५.४१ कोटी (९९.५६%) इतकी आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज तयार करताना ज्याचा अंदाज करता आला नाही, अशा कारणांमुळे खर्चासाठी नव्याने व वाढीव तरतूद करावयाची झाल्यास किंवा अकल्पीत व तातडीचा खर्च भागविण्यासाठी आकस्मिकता निधीतून घेतलेल्या आगाऊ रकमेची भरपाई करावयाची झाल्यास पूरक मागण्या करता येतात. तरीही त्याचे एकूण प्रमाण १०%वर जाऊ नये असा दंडक असताना हे प्रमाण १७.८८% वर गेले आहे.

त्याचप्रमाणे पूरक मागणी करताना विभागांनी स्वयंशिस्त लावून घेणे गरजेचे आहे. एखाद्या विभागाची पूरक मागणी विभागाच्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत अपवादात्मक स्थितीत २५%पेक्षा जास्त असता कामा नये. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर झालेल्या पूरक मागण्यांमध्ये वित्त विभाग रु. १८,८५० कोटींच्या (८९.४३%) पूरक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी रु. १६,२०० कोटींच्या पूरक मागण्या या केवळ कर्जफेड करण्यासाठी केल्या आहेत. मार्च, २०२१मध्ये सादर झालेल्या खर्चाच्या पूरक विवरणपत्रात ३७ मागण्या असून ७१ बाबींचा समावेश आहे, असेही समर्थन अध्ययन केंद्राने म्हटले आहे.

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content