Homeएनसर्कलफडणवीस-मलिक आरोप-प्रत्यारोपापासून काँग्रेसचा...

फडणवीस-मलिक आरोप-प्रत्यारोपापासून काँग्रेसचा किनारा!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. यातून महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. काँग्रेससाठी इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या आख्याड्यापासून दूर राहणे पसंत केले.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सामोपचाराने मिटला पाहिजे. सणासुदीचे दिवस आहेत. सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

इंधनदरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा जनजागरण सप्ताह

इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

केंद्रातील सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्यतेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. युपीए सरकारच्यावेळी ४४० रुपयांना मिळणारा एलपीजी गॅस आता ९५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. गेल्या ८ महिन्यांत केंद्राने जवळपास ७५वेळा इंधन दरवाढ केली. इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षांत तब्बल २५ लाख कोटींची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले, असा आरोपही त्यांनी केला.

मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीपासून म्हणजेच १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत काँग्रेसचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव-खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content