Details
‘बदला’ कुणी बघावा?
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
ज्यांना पेरी मॅसन आवडतो, अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथा आवडतात, ज्यांना सुहास शिरवळकर यांचा बॅरिस्टर अमर विश्वास आवडतो, ज्यांना हूडनइट म्हणजे रहस्यकथेची उकल आवडते. एक-एक दुव्यावरून खुन्याचा माग घेतलेला आवडतो त्या सगळ्यांनी बदला नक्कीच बघावा. ज्यांना नजरबंदीचा खेळ आवडतो त्यांनी बदला बघावा, ज्यांना दृश्यम आवडला होता त्यांनी बदला बघावा. ज्यांना सुजय घोषचा कहानी होता त्यांनी बदला सोडूच नये..
या नजरबंदीच्या खेळात इनमीन चार खिलाडी आहेत. अमिताभ बच्चन द ग्रेट, त्याच्यासमोर जोरकसपणे उभी राहिलेली तापसी पन्नू, दक्षिणेकडचा अभिनेता टोनी ल्यूक, अमृता सिंह. खुनाचा आरोप आलेली यशस्वी बिझनेसवुमन नैना सेठीला (तापसी) सोडवण्यासाठी बादल गुप्ता (अमिताभ) प्रयत्नांची शिकस्त करतोय. त्यासाठी तो तिला भेटायला आलाय. नेमकं काय घडलं ते त्याला जाणून घ्यायचंय कारण त्यातून नैनाला वाचवण्यासाठी त्याला तिची बाजू तयार करायची आहे. नेमकं काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी या दोघांमध्ये जे सवाल-जबाब, संवाद होतात ते पाहताना, ऐकताना दिग्दर्शक सुजय घोष ही काय चीज आहे ते समजून जातं.. मध्येच कधीतरी लक्षात येतं की आपण खुर्चीवर रेलून हा चित्रपट बघत नाही तर पुढे सरकून, वाकून, टक लावून पडद्याकडे बघतो आहोत..
कुरोसावा यांच्या राशोमान मध्ये एकाच घटनेच्या सहा-सात बाजू दाखवल्या होत्या. वेगवेगळ्या व्यक्तींच्या नजरेतून ती घटना दाखवली होती. इथे सुजय घोष आपल्याला नेमकं काय घडलं, काय घडू शकलं असतं, तसंही घडलं असावं, असंही घडलं असण्याची शक्यता आहे, काय घडलं असावं, नैनाला वाचवण्यासाठी सांगावं लागणारं असं घडलं असावं… अशा अनेक शक्यप्राय प्रसंगांची साखळी अमिताभ आणि नैना यांच्या जुगलबंदीतून उभी करत जातो. त्यात अमिताभ शक्यप्राय दाखवतो ते एक सत्य असतं, नैना सांगते ते एक सत्य असतं आणि असंही घडलं असेल असं दाखवणारं वेगळं सत्य असतं.. या अनेक शक्यतांच्या भेंडोळ्यात आपण गुंतत, गुरफटत जातो.
नैनावर तिच्या प्रियकराच्या खुनाचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. खोली बंद आहे, दरवाजाशिवाय कुठूनही कुणाला बाहेर जायला जागा नाही, खोलीबाहेरचे साक्षीदारही दरवाजा उघडून कुणी बाहेर पडलेच नाही सांगतायत. नैना मात्र, कुणीतरी खोलीत आधीच होतं आणि ती व्यक्ती मला बेशुद्ध करून माझ्या जोडीदाराचा खून करून गेली असं जीव तोडून सांगतेय. परिस्थितीजन्य पुरावे थेट तिच्या विरोधात आहेत. बादल गुप्ता याच चक्रव्युहातून तिला बाहेर काढण्याठी मदत करतोय. याचवेळी बेपत्ता मुलाला शोधणाऱ्या रानी कौरचा (अमृता सिंह) धागा कथानकात कहानी में ट्वीस्ट आणतो.
खरं काय घडलं ते जाणून घेण्यासाठी नैनाला बरंच काही सांगावं लागणार आहे.. तरच खरा खुनी समोर येईल. स्पॅनिश पटकथाकार, दिग्दर्शक ओरिओल पावलो याच्या मूळ पटकथेवर, चित्रपटावर (द इनव्हिजिबल गेस्ट) आधारित हा रहस्यपट दृश्यम, अंधाधून अशा चित्रपटांच्या जातकुळीतील आहे.
‘द्रौपदी ने कहा है बदला हमेशा सही नहीं होता, मगर माफ करना भी हमेशा सही नहीं होता’, हा चित्रपटातील संवाद खूप गाजतो आहे. कहानीसारखा उत्तम थ्रिलर देणाऱ्या सुजय घोषचा हा चित्रपटही अजिबात अपेक्षाभंग करत नाही.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान