HomeArchiveहाऊसफुल्ल आणि डॉ....

हाऊसफुल्ल आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

Details
हाऊसफुल्ल आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुलाखतकार – संजय मिस्त्री (व्यंगचित्रकार)

मराठी रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला इतिहास आहे. परंपरा आहे. बाल गंधर्व, दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब पाठक, केशवराव दाते यांनी ती समृद्ध केली. त्यानंतर मा. दत्ताराम, बाळ कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर यांनी ती अधिक समृद्ध केली. याच पंक्तीतले आणखी एक जबरदस्त नाव आणि ते म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. व्यवसायाने डॉक्टर, गोल्डमेडल विजेते असतानाही अभिनयाच्या वेडापायी त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्रात झोकून दिले. अफाट कीर्ती, वलय प्राप्त केले. चित्रपटामुळे दुरावलेला नाट्यरसिक त्यांनी नाट्यगृहात आणला. नाटके हाऊसफुल्ल, दिवसाला तीन शोज होऊ लागले. अशा जबरदस्त ताकदीच्या कलावंतावरील एक मराठी चित्रपट गाजतोय – आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. त्यांच्याशी केलेली छोटीशी बातचीत…

सुबोध भावेंनी यात केलेली भूमिका लाजवाब आहे. घाणेकरांचा दिलखुलास स्वभाव, भूमिकेत झोकून देण्याची तयारी. पण सुबोध भावेंनी एके ठिकाणी म्हटलंय की, मला भूमिका करायला अजिबात त्रास झाला नाही, दिग्दर्शक अभिजितने जसं दाखवलं तसं केलं मी, असे असेल तर ती भूमिका तुम्ही स्वतः का केली नाही?

आमचे सहकारी विक्रम गायकवाड यांना मी जेव्हा प्रथम भेटलो. त्यावेळी त्यांनी हाच प्रश्न विचारला, जो तुम्ही विचारतायं. पण नंतर सुबोधचं नाव डोळ्यासमोर आलं आणि त्याने भूमिकेचं सोनं केलं. अभिनय ही वेगळी गोष्ट आहे. सुबोधनं हे म्हटलंय, हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्या भूमिकेने झपाटलो होतो. हे खरं कारण आहे. 

तुम्ही सुबोधला घाणेकरांविषयी काही वाचू नका, असंही सांगितलं…

हो, चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्यामुळे संपूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर होता. बऱ्याच वर्षांपासून ह्या विषयावर चित्रपट बनविण्याचे ठरविले होते. त्यासाठी वाचन, अभ्यास केला. 

तुमचं वाचन चांगलं असेल….

मी आतापर्यंत फक्त सतराच पुस्तके वाचलीत. पण ह्या विषयावरच्या चित्रपटावर चिंतन, मनन खूप केलं.

राजेश खन्नाचं आयुष्यही जवळपास असंच आहे, मग तुम्ही त्या विषयाला का हात नाही घातला? तुम्हाला राजेश खन्ना – काका कसा वाटतो?

राजेश खन्ना हा माजा आवडता नट आहे. माझी ही आवड लक्षात घेऊन मला घऱी राजेश खन्नाला म्हणतात तेच म्हणजे काका म्हणतात. पण माझ्या लक्षात आले की, राजेश खन्ना हा तीन तासांत मावणारा नाही आणि राजेश खन्नाच्या अगोदरही मराठीत एक सुपर स्टार होऊन गेला. डॉ. काशिनाथ घाणेकर. बऱ्याच लोकांना राजेश खन्नाच भारतातील पहिला सुपरस्टार वाटतो. मला हा मुद्दा खोडून काढायचा होता. राजेश खन्ना 1970 मध्ये सुपरस्टार पदाला पोहोचला. त्या अगोदर 1966 मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यरसिकांची गर्दी खेचत होते. त्यांची नाटके हाऊसफुल्ल होत होती. दिवसाला तीन–तीन शोज होत होते. म्हणून मराठीतल्या आणि देशातला पहिल्या सुपरस्टारवर मी चित्रपट बनविण्याचे नक्की केले.

बऱ्याच वेळा आपण चित्रपटातल्या प्रमुख कलाकारांचीच तारीफ करतो. पण चित्रपट बनवताना अनेकांचा त्यात हातभार असतो. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन, मेकअप, सेट्स खूप छान आहे. त्या काळातली मुंबई खूप छान वाटते तर या पडद्यामागच्या कलावंतांविषयी काही सांगू शकाल का?

हो, विक्रम गायकवाड, नचिकेत बर्वे यांनी खूप परिश्रम घेतले. प्रसाद सुतारने तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी मुंबई अफलातून उभी केली आहे. या सुताराने मुंबई अक्षरशः बांधलीय.

गांधी, टिळक, बालगंधर्व, संजू असे आलेले बरेचसे चरित्रपट चालले. म्हणून हा चरित्रपट बनवला का?

नाही. मला पडद्यामागची दुनिया दाखवायची होती. परदेशात चित्रपट कसा बनतो. त्यामागे काय असतं, हेही दाखवितात. तिथे ते दाखविणारा एक गाईड असतो. तसं मला नाट्यसृष्टीत पडद्यामागे, विंगेत, मेकअप रूममध्ये, गाडीत काय चालतं, ते वेगळं विश्व दाखवायचं होतं. खूप रंजक विश्व आहे ते.

चित्रपटाला एवढं यश मिळण्याचं कारण डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं वलय आहे का?      

यश मराठी रसिकांमुळे मिळालंय. मराठी माणूस नाटकवेडा आहे हे मला माहीत होतं. चांगलं लेखन, चांगला अभिनय, चांगलं दिग्दर्शन, चांगलं संकलन असेल तर तो ती कलाकृती उचलून धरतो. या चित्रपटाचं यश त्यात आहे. टीमवर्कचं हे यश आहे. आणि अर्थातच डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं….”
 
“मुलाखतकार – संजय मिस्त्री (व्यंगचित्रकार)

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content