HomeArchiveसेंद्रीय खतांचे फायदेः...

सेंद्रीय खतांचे फायदेः रविवारी मुंबईत ‘किसान दौड’

Details
सेंद्रीय खतांचे फायदेः रविवारी मुंबईत ‘किसान दौड’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

कँसरचा धोका हवा, पाणी, जमीन यांच्यातील प्रदूषणामुळे वाढतो आणि त्याचा परिणाम जेवणातून होतो. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावित म्हणून वापरण्यात येणारी रसायनं, यामुळे एकूणच मानवी जीवन धोक्यात आले आहे. या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधावं तसंच शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही सेंद्रीय शेतीचे फायदे समजवून सांगावेत म्हणून येत्या रविवारी म्हणजेच २३ डिसेंबरला मुंबईत शिवाजी पार्क येथे ‘होश’ या “किसान दौड”चं आयोजन करण्यात आलं आहे.
अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या किसान दौड’मध्ये टाटा कँसर हॉस्पिटल तसंच समाजातील अन्य मान्यवरांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती अंबागोपाल फाउंडेशनचे संस्थापक हरीश शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

आपलं जीवन पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. यातील हवा, पाणी, जमीन ही तत्वंच प्रदूषित झाली आहेत. यामुळे येत्या काळात आपल्याला घरोघरी कँसरचे पेशंट दिसणार आहेत. हा धोका टाळायचा असेल तर आपण स्वत: आणि समाजालाही जागृत करण्यासाठी हरीश शेट्टी यांनी “होश” ही मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त सेंद्रीय पद्धतीने शेती केली पाहिजे, ग्राहकांनीही सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाल्लं पाहिजे आणि विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य सर्वांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्धही झाले पाहिजे, यासाठीहोश’च्या माध्यमातून शेट्टी जनजागृती करत आहेत. आजपर्यंत अनेक न्यायाधीश, अधिकारी, रूग्णालये, महाविद्यालये, सामान्य नागरिक यांनी या मोहीमेला समर्थन दर्शवलं आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखों लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला आहे.

सुमारे १० हजार शेतकरी आणि युवक २३ डिसेंबरला किसान दिनाच्या निमित्ताने आयोजित या “किसान दौड”मध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार घेणारे जवळपास २०० रूग्णही यात सहभागी येणार आहेत. दूषित अन्नसाखळीमुळे वाढत चाललेला कँसरचा धोका टाळायचा असेल तर आजच केमिकलयुक्त अन्न आपण बंद केलं पाहिजे यासाठी सर्वांनी दबावगट निर्माण केला पाहिजे, असा संदेश या दौडच्या निमित्ताने देण्यात येणार आहे. येत्या काळात केमिकलयुक्त अन्न उत्पादनावरच बंदी आणायला हवी यासाठी एक पिटीशनही होशच्या वतीने न्यायालयात दाखल केली जाणार आहे.

२३ डिसेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथून सकाळी ७ वाजता ही “किसान दौड” सुरू होणार आहे, तरी या दौड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी, संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरीश शेट्टी यांनी केलं आहे. ज्यांना या दौडमध्ये सहभागी व्हायचे आहे, होशच्या कामात आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ९१६७३५२७७२ या क्रमांकावर संपर्क करावा अशी माहीती हरीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content