HomeArchiveशाब्बास, इंडिया!

शाब्बास, इंडिया!

Details
“शाब्बास, इंडिया!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
शाब्बास इंडिया, शाब्बास! भारतीय हवाई दलाच्या जवानांनी उत्तम कामगिरी केली. पाकिस्तानमध्ये शिरून जैश-ए-महम्मदची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली. 14 फेब्रुवारीला जैशच्या भेकड अतिरेक्यांनी भारताच्या 42 जवानांचा बळी घेतला. आपल्या ड्युटीवर निघालेल्या त्या निरपराध जवानांना विकृत पाकड्यांनी ठार केले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर भारतीय जवानांनी जैशवर सूड उगविण्याची प्रतिज्ञाच केली होती. ती त्यांनी 12 दिवसांत खरी करून दाखविली. पाकिस्तानमधील बालकोट येथे असलेली अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे भारतीय हवाई दलाच्या जवानांनी उद्ध्वस्त केली. ही कारवाई काही मिनिटांत पार पाडली. विशेष म्हणजे भारताच्या एकाही विमानाचे नुकसान झाले नाही. अथवा एकाही जवानाचा बळी गेला नाही. पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या जैशच्या अतिरेक्यांना त्यांनी पैगंबरवासी केले. पुलवामामध्ये भारतीय जवानांचा बळी घेतल्यानंतर त्या हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या नेतृत्त्वाखालील याच जैशने स्वीकारली होती.

भारतावर वेळोवेळी अतिरेकी हल्ले झाले. पण अशाप्रकारचा प्रतिहल्ला भारताने केला नव्हता. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतरही प्रतिहल्ला होईल अशी जैशची अपेक्षाच नसावी. त्यांचा बेसावधपणा हेच दर्शवतो. किंबहुना, 1971 नंतर प्रथमच भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची हद्द ओलांडून बॉम्बहल्ला केला. 1999 साली कारगिल युद्धातदेखील पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार न करण्याचा आदेश भारतीय हवाई दलाला दिला होता. जगभरातील युद्धशास्त्रातील तज्ञांनुसार अणुबॉम्ब बनवून ब्लॅकमेल करणारा पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे. याउलट अणुबॉम्ब आपण आधी वापरणार नाही ही भारताची नीती आहे. त्यातूनच पाकिस्तानचा असा गोड गैरसमज झाला असावा की, अतिरेकी हल्ल्याचे उत्तर भारताकडून कधी मिळणारच नाही. युद्धाची भूमिका भारत घेणारच नाही. पण कालचा हल्ला म्हणजे युद्ध नव्हते. पाकव्याप्त काश्मिरमध्ये अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात होते. हे अतिरेकी भारतावर आणखी मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होते. म्हणूनच त्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने घेतलेली ही दक्षता होती.

यासंदर्भात परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलेले खुलासा भारताची मान जगात अभिमानाने उंच करणारा आहे. ते म्हणाले की, `या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक अथवा लष्कराचे जवान मारले जाणार नाहीत याची भारताने काळजी घेतली.’ विजय गोखले यांनी हेच दर्शवले की, भारताचा हा हल्ला पाकिस्तानवर नव्हता तर पाकिस्तानमध्ये दडलेल्या अतिरेक्यांवर होता. यासंदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पाकिस्ताननेदेखील अतिरेक्यांविरूद्ध कडक भूमिका स्वीकारण्याची नीती मान्य केली आहे. पाकिस्तानच्या भूमित अतिरेकी कारवाया करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन पाकिस्तानने 2004 सालीच भारताला दिले होते. तथापि, पाक भूमिवरील या कारवाया काही कमी झाल्या नाहीत. मसूद अझहरसारखे अतिरेकी हे तरुणांमध्ये जिहादचे विष पेरतच राहिले. त्यातूनच काश्मिरमधील निरागस तरुणांना त्यांनी लक्ष्य केले. या तरुणांना पाकव्याप्त काश्मिरमध्ये न्यायचे आणि त्यांच्या मनात भारताविरूद्ध विष पेरायचे हे अतिरेक्यांचे चाळे सुरूच राहिले. पुलवामा येथे काश्मिरी तरुणाने केलेला आत्मघातकी हल्ला हे त्या अतिरेकी कारवायांचेच फलित आहे. भारतीय हवाई दलाने या अतिरेक्यांना कंठस्नान घालून पुलवामा हत्याकांडाचा सूड उगवला आहे. पण आता माघार घेता कामा नये. जेथे जेथे अतिरेकी असतील तेथे तेथे असे हल्ले झालेच पाहिजे. भारतातील सर्वसामान्य जनता भारतीय जवानांच्या पाठीशी आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content