HomeArchiveविवाहित असूनही बजरंगबली...

विवाहित असूनही बजरंगबली ब्रह्मचारी!

Details
विवाहित असूनही बजरंगबली ब्रह्मचारी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुस्लिम आक्रमणापसून नंतर पुढे इंग्रज राजवट नि स्वातंत्र्याच्या १५-२० वर्षांनंतर हिंदुत्वाच्या नावे ओळखला जाणारा हा देश निधर्मी, धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जाईल अशी रचना राज्यकर्त्यांनी केली. मात्र, येथील देव-देवतांची छाप कोणी पुसू शकत नाही. शंकर, विष्णू, गणपती, अशा मुख्य देवतांसह त्यांचे भक्त, दासही इथे देवत्व मिरवतात. त्याचं उदाहरण म्हणजे बजरंगबली हनुमान! रामायण, महाभारत, गीता, या देशाचे धर्मग्रंथ. यातील व्यक्तिरेखा, पूजनीय देवत्व बहाल झालेल्या, त्यांच्या अचाट कामगिरीमुळे. असो, प्रभू श्रीरामाचा दास महाबली हनुमान देशातील पहिलवान, बल उपासकांचा देव. चैत्र शुद्ध पौर्णिमा ही त्याची जन्मतिथी. अनेक संकटात तारण करणारा म्हणूनही प्रसिद्ध. हनुमान चालीसा स्तोत्र श्रद्धेने म्हणणारे बहुसंख्य आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

भगवान शंकराचा अवतार म्हणून फार कमी लोकांना हनुमान ज्ञात असतील. आपल्या आईला शापातून मुक्त करण्यासाठी त्यांचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. सीतामाई प्रभू रामांच्या दीर्घायुष्यासाठी भांगात सिंदूर लावते हे पाहून स्वतःचे शरीर शेंदरात त्यांनी रंगवून घेतलं. तेव्हापासून बजरंगबलीला शेंदूर लावण्याची प्रथा आली, अशी आख्यायिका आहे. हनुवटीच्या आकारामुळे हनुमान हे नाव आलं. संस्कृतमध्ये हनुमान म्हणजे वाकडी हनुवटी असं सांगतात. पृथ्वीवरच्या काही चिरंजीवींपैकी हनुमान एक. रामचंद्रांचे गुरू विश्वामित्र एकदा काही कारणाने कृद्ध झाले. त्यांनी हनुमानाचा वध करण्याची आज्ञा श्रीरामांना केली गुरू आज्ञा टाळता येईना. त्यामुळे रामानी तसं केलं, पण बुद्धिमत्ता असलेल्या हनुमानांनी रामनामाचा धावा सुरू केला. त्यामुळे झालं असं, रामाची सारी शस्त्र बोथट होऊन हनुमान तरले.

वाल्मिकीआधीच..

असं सांगितलं जातं की रामायण हे वाल्मिकींनी लिहिण्याआधी हिमालयात जाऊन हनुमानांनी ते लिहिलं होतं. लंकाकांड सुरू होताच आपल्या नखांनी रामायण लिहिण्यास घेतल्याची खातरजमा वाल्मिकींनी करून घेतली. रामभक्त हनुमानाचे भाऊ म्हणून भीमाचे नातं महित नसेल कारण पवनपुत्रचे चिरंजीव भीम आहे. श्रीराम निधनानंतर शोक असह्य होऊन पृथ्वीवर हनुमानांनी उत्पात माजवू नये म्हणून ब्रह्मदेवाच्या मदतीने या दासाला शांत करण्यासाठी रामाने पाताळलोकात धाडून दिल्याचं म्हंटलं जातं. आपल्या नवऱ्यावरची इतकी भक्ती, प्रेम पाहून खुश झालेल्या सीतामाईने हनुमानास एक किंमती हार भेट द्यायचे ठरवले. पण, तो घेतला जात नाही हे पाहून माईला प्रचंड राग आला. त्यावेळी तो शांत करण्यासाठी हनुमानजीनी आपली छाती फाडून प्रभू रामचंद्र दाखवून त्यांचा राग संपवला. याशिवाय फार किंमती असं जीवनात काही नाही असा संदेश दिला. हनुमंताची १०८ नावं ही त्यांच्या जीवनअध्यायाच सार असल्याचं सांगितलं जातं. ती घेऊनही रामाच्याजवळ मनुष्य जाऊ शकतो.

विवाहित हनुमान..

ब्रह्मचारी म्हणून हनुमंताची ओळख असली तरी पुराणांत मकरध्वज नावाच्या पुत्राचे ते पिता असल्याचा उल्लेख आहे. ती कथा अशी, ज्यावेळी हनुमंत समुद्र पार करीत होते, तेव्हा शरीरातून वाहणाऱ्या घामाचे थेंब एका मगरीने गिळले. यातून ती गर्भवती राहिली. यामुळे मकरध्वजचा जन्म झाला. ब्रह्मचारी असलेले हनुमंत विवाहित होते नि तरीही ओळख ब्रह्मचारी राहिली. हा आजच्या काळातील शासकीय तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासारखा विवाह होता. तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात पत्नी सुर्वाचलासह हनुमंताची पूजा होते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला विवाह वर्धापनदिन लोक धुमधडाक्यात साजरा करतात. मंदिरात त्यांच्या मूर्तीची पूजा होते.

या विवाहमागे कारण असे सांगितले जाते, भगवान सूर्याचे चेले मानले जाणारे हनुमान सूर्याकडील नऊ विद्या मिळवत असता राहिलेल्या चार विद्यांसाठी विवाहाची अट होती. त्याच्या निवारणार्थ सूर्यदेवानी हनुमानाची परवानगी मागितली. ती मिळताच त्यांनी आपल्या तेजाने मुलगी जन्माला घातली. तिचे नाव सुर्वाचला ठेवून तिच्याशी लग्न लावून दिले. तिचा जन्म योनीशिवाय झाल्याने लग्न करूनही हनुमंतजींच्या ब्रह्मचर्यात बाधा आली नाही, असे सांगतात. विद्यमान काळात प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत जन्मस्थळी कधी होईल ते होईल पण बजरंगबलीची मंदिरे बरीच आहेत. अगदी विदेशातही मंदिरं आहेत. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हनुमानभक्त आहेत. नाशिकच्या एका पाच-सहा वर्षीय मुलाला हनुमान मूर्ती संग्रहाचं वेड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा ती पूजाअर्चा करा, जय बजरंगबली, तोड दुश्मन की नली, असे म्हणत मतदान अवश्य करा.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content