HomeArchiveमराठा आरक्षणासोबतच मुसलमानांनाही...

मराठा आरक्षणासोबतच मुसलमानांनाही आरक्षण द्या! एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांची मागणी

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
आम्ही मराठा आरक्षणाविरूद्ध नाही तर, आम्हाला मराठा आरक्षणासोबतच मुसलमानांनाही आरक्षण द्यावे, अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनीही मुस्लीम समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

२००६ मध्ये सच्चर आयोग, २००७ मध्ये डॉ. रंगनाथ मिश्रा आयोग, २०११ मध्ये राज्य अल्पसंख्याक आयोग आणि २०१२ मध्ये मध्ये डॉ. मेहमूद उर रहमान समितीने मुसलमान सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या १५ वर्षांच्या राजवटीत त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. २०१४ नंतर राज्यात आलेल्या शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तर त्यांना मुसलमानांशी काही देणे-घेणे नसल्याचे जाहीरच केले. मराठा आरक्षणासाठी लाखोंनी काढलेल्या मोर्चाला मुस्लीम समाजाने पाठिंबा दिला होता. पण, सरकारने फक्त मराठा समाजाचाच विचार केला. मुस्लीम तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार केला नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात जाण्याखेरीज पर्याय उरला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देत आहात. मग, तोच न्याय मुसलमानांना का लावला जात नाही, असा आमचा सवाल आहे, असे जलील म्हणाले.

सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही समाजाला मदतीचा हात मिळाला पाहिजे, असे आमचे मत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या बाबींचा विचार झाला तो मुस्लीम समाजाला आरक्षण देताना केला गेला नाही, हे आम्हाला न्यायालयाला पटवून द्यायचे आहे. परंतु, काहीजण आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाविरूद्ध आहोत. आमची याचिका मराठा समाजाच्या आरक्षणाविरूद्ध आहे, असा गैरसमज पसरवत आहे. हे निव्वळ खोटे, दिशाभूल करणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content