HomeArchiveभांडारकर प्राच्यविद्या संशोधन...

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रात रंगला पुस्तक प्रदर्शनाचा सोहळा!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि डायमंड पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी दुर्मिळ पुस्तकांच्या डिजीटल लायब्ररीचं (www.borilib.com) उद्घाटन झालं. प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. गो. ब. देगलुरकर यांनी त्याचं उद्घाटन केलं. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार प्रदीप रावत, राहुल सोलापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

यानंतर बोरी पब्लिकेशन्स तसंच डायमंड पब्लिकेशन्स यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचं उद्घाटन मिरासदार यांच्या हस्ते झालं. इतिहास, तत्त्वज्ञान, धार्मिक आदी वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचा या प्रदर्शनात समावेश आहे. २६ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ८, या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. यानंतर देगलुरकर यांनी वेरूळ लेण्यांच्या सौंदर्यावर, वेरूळ – एक अप्रतिम शिल्प, या विषयावर व्याख्यान दिलं.
याच संस्थेच्या प्रांगणात येत्या शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता मुलाखतकाराची मुलाखत, हा कार्यक्रम होणार आहे. यात ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची प्रकट मुलाखत घेतील.

या कार्यक्रमाचं अंतीम पुष्प बुधवारी, २६ डिसेंबरला गुंफलं जाईल. त्यादिवशी संध्याकाळी सहा वाजता नियोजित ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर ढेरे यांचे मुक्तचिंतनही होईल.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content