HomeArchiveबिल्डर आणि घरखरेदीदारांसाठी...

बिल्डर आणि घरखरेदीदारांसाठी आयकरात सवलत!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
आत्मनिर्भर भारत पॅकेज 3-0 या अंतर्गत आदरणीय अर्थमंत्र्यांनी 12 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या करसवलतींत काही सवलती बांधकाम व्यावसायिक आणि गृह खरेदीदारांसाठी देण्यात आल्या आहेत.
 
“2018 सालापर्यंत आयकर कायदा 1961(the Act)च्या 43CA अधिनियमानुसार स्थावर मालमत्ता हस्तांतरण विक्रीवरील मुद्रांक शुल्क जर त्याच्या, सर्कल रेट (सरकारने नेमून दिलेला दर)पेक्षा कमी असेल तर त्याची सखोल चौकशी केली जात होती. याचा परीणाम म्हणून कायद्याच्या 56 (2)(x) कलमाअंतर्गत खरेदीदाराचा विचार करुन मुद्रांक शुल्काचा विचार केला जात असे.”
 
 
 
बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना करसवलत देण्यासाठी वित्त कायदा 2018च्या अन्वये अशावेळी 5%पर्यंतचा फरक मुद्रांक शुल्कासाठी सुरक्षित म्हणून विचारात घेतला जात असे. त्यामुळे गृहखरेदी/विक्री करताना या सवलतीतील फरक 5%पेक्षा जास्त असल्यास या गृहितकातील तरतुदी लागू असत. आता यात सवलत देताना वित्त कायदा 2020च्या नुसार हा फरक 5%वरून 10%पर्यंत सुरक्षित म्हणून वाढविण्यात आला होता. सध्या बांधकाम व्यावसायिक आणि खरेदीदार यांच्या मालमत्तेतील खरेदी/विक्रीतील करारानुसार किंमत आणि सर्कल दराप्रमाणे किंमत यातील फरक 10%पेक्षा जास्त असेल तर त्या प्रकारच्या मालमत्ता विचारात घेतल्या जातील.
 
बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील मागणीत वृद्धी होण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकांना आपल्या न विकल्या गेलेल्या सदनिका सर्कल रेटपेक्षा पुष्कळ कमी दराने विकता येतील. त्याचा लाभ खरेदीदारांना मिळू शकेल यासाठी येत्या 12 नोव्हेंबरपासून ते 30 जून 2021पर्यंत आयकर कायद्याच्या 43 CA अधिनियमानुसार 2 कोटी रुपये किंमतीच्या प्रथम विकल्या जाणाऱ्या निवासी सदनिकांसाठी हा फरक आता 10%वरून 20%वर नेण्यात आला आहे. तसेच हा फरक 10%वरून 20%पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे कायद्याच्या कलम 56(2)(x) यानुसार या करसवलतीचा लाभ नेमून दिलेल्या कालावधीसाठी खरेदीदारांना मिळेल. अशा व्यवहारात खरेदी/विक्रीच्या करारातील फरक सर्कल रेटपेक्षा 20%पेक्षा जास्त असला तरच त्या मालमत्तांचा विचार केला जाईल. यासाठी कायदेविषयक दुरुस्ती लवकरच केली जाईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content