HomeArchiveधनुष्याला बाण तर...

धनुष्याला बाण तर जोडला..

Details
धनुष्याला बाण तर जोडला..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]

धनुष्याला प्रत्यंचा चढवली, बाणही जोडलाय.. पण सोडायचा कुठल्या दिशेने, कुणावर, अशी काहीशी संभ्रमावस्था शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झाली आहे. शिवसेनेची भाजपाबद्दलची जळजळ, असूया आता लपून राहिलेली नाही. तितकीच भाजपाचीही शिवसेनेबद्दलची तुच्छता लपून राहिलेली नाही. परस्परांबद्दल क्वचितच चांगले बोलणारे हे दोन्ही पक्ष राज्यात सरकार चालवत आहेत हेही नवलच. खरे तर सरकार भाजपा चालवत आहे आणि शिवसेना जमेल तितकी आपल्याच सरकारला, भाजपाला लक्ष्य बनवताना अडचणीत आणत आहे हे योग्य वर्णन होईल. योग्य वेळ येत नाही तोपर्यंत शिवसेना सत्तेतून पायऊतार होणार नाही. ही योग्य वेळ कधी येणार हे शिवसेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांनाही माहिती नाही. नाईलाजाने एकत्र नांदणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकांना मात्र एकत्र सामोरे जातील का याविषयी खुद्द शिवसेनेत, भाजपात आणि उद्धव ठाकरे यांच्या मनातही साशंकता आहे. आपण नेमके काय करावे हे उद्धव ठाकरे यांना अद्याप ठरवता आलेले नाही.

त्यांचे ठरत नाही म्हणून आदित्य ठाकरे यांचे ठरत नाही. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठरत नाही. भाजपाने टाकलेल्या गळाभोवती घुटमळणाऱ्या शिवसेनेच्या शिलेदारांचे ठरत नाही अशी सगळी मूढावस्था आहे. शिवसेनेचे ठरत नाही म्हणून भाजपाला थेट काही बोलता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मनीचे गुज बोलून दाखवता येत नाही. फडणवीस बोलत नाहीत म्हणून दानवे काही बोलत नाहीत. तावडे काही बोलत नाहीत. चंद्रकांतदादा पाटील कधीतरी काहीबाही बोलतात. पण त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. हे असे निवडणुका जाहीर होईपर्यंत सुरू राहणार हे मात्र आता नक्की झाले आहे. शिवसेना ही बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला लोढण्यासारखी वाटू लागली आहे आणि भाजपाच एक ओझे असल्याचे राज्यात स्वबळासाठी, बहुमतासाठी फुरफुरणाऱ्या शिवसेनेला वाटते आहे. दोन्ही पक्षांना मनातून युती नकोच आहे तरीही तुझे माझे जमेना पण सत्ता हवी म्हणून युती तुटेना, असे सध्या सुरू आहे. सत्तेसाठी युतीची ही नाटके कदाचित निवडणुकीतही सुरू राहतील वा स्वतंत्र लढून पुन्हा जनतेच्या भल्यासाठी एकत्र येण्याचा हातखंडा फसवणूक प्रयोगही निवडणुकीनंतर रंगवला जाईल.

पण, यदाकदाचित शिवसेनेने धनुष्यावर चढवलेला बाण भाजपाला घायाळ करण्यासाठी सोडलाच तर भाजपा एकट्याने लढण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. गावपातळीवर, बूथ पातळीवर, तालुका, विधानसभा मतदारसंघ पातळीवर भाजपाची सर्व चाचपणी, पाहणी कधीच पूर्ण झाली आहे. त्याचे अहवालही भाजपाच्या नेतृत्त्वाकडे पोहोचले आहेत. या अहवालातील चित्र राज्यात कमळ पुन्हा फुलवण्यासाठी पोषक नसल्यामुळेच भाजपा बिचकतो आहे. मात्र, शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाच तर भाजपा नेत्यांचीही तोंडे मोकळी होतील आणि मन की बात ओठांवर येईल हे नक्की. दोन्ही पक्षांना राज्यात एकहाती सत्ता हवी आहे. पण, राज्यातील समीकरणे गेल्या वर्षभरात झपाट्याने बदलली आहेत. अपेक्षाभंग, आश्वासनभंग याला सामोऱ्या गेलेल्या मतदारांचा दोन्ही पक्षांनी भ्रमनिरास केला आहे. आहे त्यापेक्षा कालची राजवट बरी होती, असे काहीसे लोकांना वाटू लागले आहे. उद्धव यांना हे माहिती असल्यामुळेच त्यांनी भाजपाआधीच राम मंदिराचा, शेतकरी कर्जमाफीचा, राफेल खरेदी कराराचा मुद्दा उगाळायला सुरूवात केली आहे. राम मंदिराचा मुद्दा त्यांनी सफाईने भाजपाच्या नजरेखालून पळवला आहे. अर्थात कुंभकर्णाला जागे करायचे आहे, राम मंदिराचे काय करता ते सांगा, या सगळ्या पोकळ डरकाळ्या आहेत.

हे निवडणुकीसाठीचे नाटक सुरू झाले आहे. उद्धव यांच्या दबावतंत्राचा तो एक भाग आहे आणि हे दबावतंत्र मुख्यमंत्रीपदासाठी आहे. शिवसेना एकहाती सत्ता मिळवू शकते, नाहीतर भाजपापेक्षा अधिक जागा जिंकू शकते असा समज उद्धव यांच्या सल्लागारांनी करून दिला आहे. यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना राजकीय फासे टाकत आहे. अर्थात भाजपाचे चाणाक्ष चतुर देवेंद्र फडणवीस हे कदापि होऊ देणार नाहीत. पाहिजे तर जागा अधिक देऊ पण मुख्यमंत्रीपद विसरा, असा निरोप भाजपाने कधीच शिवसेनेला पाठवला आहे. यामुळेच उद्धव यांच्या भाजपावरील हल्ल्यांना, टीकेला तलवारीची धार आली आहे. शिवसेना, उद्धव आणि त्यांचे दुसऱ्या फळीतील नेतेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट शरसंधान करू लागले आहेत. भाजपाच्या बदललेल्या दिवसांचेही हे एक दुश्चिन्ह म्हणावे लागेल. मोदींवर थेट आरोप करायला दीड वर्षांपूर्वी शिवसेनाच काय इतरही कुणी फार धजावत नव्हते. आता मात्र विरोधी पक्षांनी आणि मित्र म्हणवणाऱ्या शिवसेनेनेही मोदींना घेरले आहे. जागावाटप, युतीच्या फालतू चर्चेत मला रस नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव यांचे लक्ष्य मुख्यमंत्रीपद आहे. ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री किंवा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद यापैकी एखादा प्रस्ताव शिवसेनेच्या पसंतीस उतरलाच तर धनुष्याला लावलेला बाण पुन्हा भात्यात रवाना होईल यात शंका नसावी.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content