HomeArchiveतुमच्या मुलांचे मानसिक...

तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य!

Details
तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. केदार तिळवे, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट, हिरानंदानी हॉस्पिटल
मुले आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात आणि अनेक पालकांसाठी एक मोठा अभिमान आणि आनंद असतात. गर्भधारणेपासूनच मुले आपल्या पालकांची अपूर्ण स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्याचे साधन होतात. पालक आणि मुलाचे नाते हे अत्यंत शुद्ध, मजबूत आणि प्रिय असते आणि ते आयुष्यभर टिकते. यामुळे तुमच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही पालकांचीच जबाबदारी आहे.

मुलांवर गंभीर परिणाम करणारे आजार किंवा परिस्थितींकडे पाहूयाः
अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)- एकाच जागी सतत बसण्यातली असक्षमता किंवा एकाग्रतेत अडचण किंवा खूप प्रमाणात मनमानी हे सर्व यात दिसते. त्यात दुय्यम परिणामांमुळे जास्त प्रमाणात मानसिक आजारही दिसतात. औषधे, उपचार, आहारातील बदल आणि पालकांच्या समुपदेशनाचा फायदा होतो. पण आजाराचे निदान करणे महत्त्वाचे असते.

नैराश्यः बालवयातील नैराश्य २ टक्के आढळते आणि किशोरवयात ते दुपटीपेक्षा जास्त होते. स्वतःला इजा करण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. मुलाला आपल्या मनातील दुःख ओळखता येणार नाही हे लक्षात ठेवण्याची गरज असते आणि ते सामान्यतः चिडचिड करणे, रागाचा स्फोट होणे आणि मन काढून घेणे इत्यादी वागणुकीचे प्रकार दाखवते.

छळः मुलाचा लैंगिक आणि मानसिक छळ हा एक काळजीचा मोठा विषय आहे आणि आपण या घटनांची लक्षणे आणि चिन्हे पाहिली पाहिजेत. तसेच सुयोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे.

वेगळे होण्यातला त्रासः आपण भावनिकदृष्टया जोडलेले असलेल्या व्यक्तींपासून किंवा आपली काळजी घेणाऱ्यांपासून दूर होण्याच्या वेदना मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात आणि मुले मोठी होतात तसे त्याच्याशी जुळवून घेतात. परंतु टोकाच्या परिस्थितीत यामुळे सेपरेशन एंक्झायटी होऊ शकते आणि त्यासाठी औषधे किंवा उपचारांची गरज असते.

शिकण्यातील अडथळेः लिहिलेला शब्द किंवा आकडे समजून घेण्यात त्रास होण्याशी हे संबंधित आहे. त्याचा त्रास असलेल्या मुलांसाठी हे तणावपूर्ण ठरते आणि त्यामुळे ताण येऊन त्यांचा आत्मविश्वास आणि एकात्मता कमी होते. लवकर निदान आणि हस्तक्षेप यांच्यामुळे मुलांना या समस्येशी नीट जुळवून घेणे शक्य होते.

धमक्या किंवा धाक: फसवणारी व्यक्ती आणि फसवली जाणारी व्यक्ती यांच्यासाठी ही एक मोठी गोष्ट असते. याचा खूप दीर्घकाळ मानसिक ट्रॉमा राहतो आणि भीती, मूड स्विंग्सचा त्रास, आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड इत्यादी गोष्टी त्यातून घडतात. शाळेत जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज आहे. आपण सायबर फसवणूक आणि आपल्या मुलांना होत असलेल्या ट्रोलिंगच्या त्रासाबाबतही जागरूक राहिले पाहिजे.

पालकांकडून होणारे दुर्लक्षः मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे पालकांकडून होणारे दुर्लक्ष किंवा कठोर किंवा मालकी हक्काची वागणूक. यामुळे मुलाच्या मानसिक परिपक्वतेवर परिणाम होतो. टायगर किंवा हेलिकॉप्टर पॅरेंटिंगही करू नये कारण मूल त्यामुळे प्रचंड चिडचिड करते आणि त्याच्यात अवलंबित्व येण्याची शक्यता असते.

आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही या काही गोष्टी करू शकताः
1. सुरक्षित घरः तुमच्या मुलासाठी घरी परतायला एक ऊबदार, स्वागतार्ह आणि सुरक्षित वातावरण तयार करा. भावनिकदृष्टया निरोगी मुलाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
2. जीवन कौशल्ये: तुमच्या मुलाला सर्वांगीण विचार, नेतृत्त्वगुण, चांगले ऐकणे, सहानुभूती देणे, मनमानीला आळा घालणे, कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी महत्त्वाची कौशल्ये शिकवा.
3. पालकत्व: मुलाचे पालकत्व स्वीकारण्याची अचूक पद्धत नाही. पण एक लवचिक, सुयोग्य दृष्टिकोन आणि स्पष्टपणे स्थापित केलेले नियम ही एक चांगली सुरूवात आहे.
4. तुलना टाळणे: मुलाच्या स्पर्धात्मक स्वभावासाठी निरोगी स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु सातत्यपूर्ण आणि अवाजवी तुलना केल्यामुळे समस्या निर्माण होतात आणि भावंडांमध्ये मोठे शत्रुत्व निर्माण होते किंवा नाजूक उगवती मैत्री नष्ट होण्याची शक्यता निर्माण होते.
5. प्रत्येक मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्वः त्यामुळे त्याला तुमच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांचे आंधळेपणाने पालन करायला भाग पाडू नका. त्यांना एक स्वतंत्र मन असू द्या आणि त्यांना पोषक वातावरण देऊन मार्गदर्शन द्या. परंतु ते मोठे झाले की त्यांचे निर्णय स्वतःवर सोडा.
6. बालपण जगू द्या: तुमचे मूल किमान एक छंद जोपासेल आणि किमान एका खेळात सहभागी होईल याची काळजी घ्या. तसेच त्यांना आराम करायलाही वेळ द्या.
7. टाइम-प्लीज: टाइम प्लीजची एक परंपरा सुरू करा जिथे तुमचे मूल तुमच्यासोबत तुम्ही त्याच्यावर रागवाल किंवा शिक्षा द्याल याची भीती न बाळगता बोलू शकेल. हा विश्वास कायम राखा.
8. विश्वासाचे वर्तूळ: समस्या असल्यावर तुमचे मूल पोहोचू शकेल अशा विश्वास आणि आपत्कालीन प्रोटोकॉलच्या वर्तुळाची चर्चा करा आणि ते स्थापित करा. त्यांना पळून जायला किंवा ओरडायला शिकवा आणि कोणत्याही धोकादायक स्थिती असल्यावर त्यांना मदत कशी होईल हे सांगा.
9. प्रतिक्रिया यंत्रणा तयार करा: त्यांचे मित्र कोण आहेत याची माहिती ठेवा आणि त्यांची किंवा त्यांच्या पालकांची ओळख ठेवा. तुम्ही एकाच स्थितीत आहात आणि मुले मोठ्यांप्रमाणेच गॉसिप करतात हे लक्षात ठेवा. तसेच त्यांच्या शिक्षकांकडून चांगला आणि वाईट अभिप्राय घेण्याचे लक्षात ठेवा. हे केल्यामुळे तुम्हाला हे कळते की तुमचे मूल कसे काम करते आहे आणि त्यांच्या समस्या आपल्याला लगेच कळतात.
10. लक्ष ठेवणे: त्यांच्यावर लक्ष ठेवा, पण त्यांना पुस्तकं आणि वेळापत्रक यांच्याखाली दाबून टाकू नका.
11. प्रेम व्यक्त करणे: तुमच्या मुलांना हे सतत सांगत राहा आणि हेही सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी आहात आणि हे प्रेमाचे बोल ऐकताना त्यांना कधीही कंटाळा येणार नाही.”
 
“डॉ. केदार तिळवे, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट, हिरानंदानी हॉस्पिटल

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content