HomeArchiveतावडे गुरूजींची 'शाळा'..

तावडे गुरूजींची ‘शाळा’..

Details
तावडे गुरूजींची ‘शाळा’..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]

मा. तावडे गुरूजी,
स.न.वि.वि.
पत्रास कारण की, माझा मुलगा पत्रकार होण्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. आपण त्याच्या महाविद्यालयात आलात त्यावेळी त्याने स्वतःची अक्कल दाखविण्याचा प्रयत्न केला. मी ते टीव्हीवर पाहिले आणि माझी तळपायाची आग मस्तकात गेली. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे आपण महागुरू आणि या गधड्याला अक्कलच नाही? त्याने तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रश्न विचारला, उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार का? खरं म्हणजे मी समोर असतो तर त्याच्या कानाखालीच महाराष्ट्राचा नकाशा काढला असता..

तावडे गुरूजी! बघा आपण राज्याचे शिक्षणमंत्री. परंतु, मी आपणास साहेब बीहेब न म्हणता तावडे गुरूजी बोलतो. मीही संघामध्ये होतो. संघाने आमच्यावर गुरूजनांचा सन्मान करण्याचे डोक्यात चांगले फिक्सड केले आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचं म्हणजे आपल्या तिजोरीवर केवढा बोजा हो! याचं या मुलांना काहीच कळत नाही. सगळं फुकटात पाहिजे. तुमची परिस्थिती होती का शिक्षण घ्यायची? पण, आपण परिस्थितीवर मात करत, पदवी कोणत्याही युनिव्हर्सिटीची असे ना, पण मिळवली ना? त्यामुळे आज राज्याचे शिक्षणमंत्री झालात!

तुमचंही चुकलं तावडे गुरूजी. तुम्ही कोणत्या त्या ज्ञानेश्वर विद्यापीठात पदवी घेतली त्याची माहिती त्या मुलांना द्यायला पाहिजे होती. जाऊ द्या ते! तुमच्या पाठीमागे किती व्याप हो? व्याप आहेत. पण, व्यापमसारखे प्रकार तुमच्याकडून घडले नाहीत आणि तो तुमचा स्वभाव नाही! बरं, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले तर ते प्रायव्हेट क्लासेसमध्ये जाणारच. फार हुशार मुले आहेत आजकालची! सरकारला शेंडी लावून आपल्या पदरात फुकट काय ते मागून घ्यायचे.. हे त्यांना कळतं. याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतात. मोबाईल चार्जिंग करायला पैसे असतात. मात्र, फी भरायला पैसे नाहीत. (नाथाभाऊंनी शेतकऱ्यांना खडसावून सांगितले होते, ते आठवत असेल तुम्हाला) तुम्ही वेळीच त्यांना झाडलं ते बरे केलं. शिक्षण मोफत देऊ, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल.. हे सुनावले ते बरे केलंत. या देशात शेतकरीच गरीब नाहीत, अनेक गरीब आहेत. तावडे गुरूजी, हे विद्यार्थी फारच आगाऊ व चलाख दिसतात. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. काहीतरी पदरात पाडून घ्यावे हे लक्षात घेऊन तुम्हाला बोलतं करण्याचा त्यांचा डाव तुम्ही वेळीच उधळला. नाहीतर आजकाल कोणीही मंत्री सत्तेत आहे म्हणून वाटेल ते आश्वासन देतात. आपण काही विनोदाने न घेता सरळ सांगून टाकलं की उच्चशिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मोफत शिक्षण देणार नाही.

मा. तावडे गुरूजी, तुम्ही तर कमाल केली! माझा मुलगा आपल्याला प्रश्न विचारत असतांना एक विद्यार्थी व्हिडीओ शूटिंग करत होता. काय तुमचं बारीकसारीक लक्ष असत हो? तुमच्यातला मंत्री जागा झाला. पोलिसांना तुम्ही त्या विद्यार्थ्याला म्हणजे माझ्या मुलाला अटक करण्याचे फर्मान काढले. प्रथम मुलांना तुम्ही विनोद करता की काय असं वाटलं. जेव्हा पोलिसांनी त्याची बकोटी पकडून गाडीत कोंबले, तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य आठवू लागले. पोलीस केस झाली तर नोकरी मिळणे कठीण होईल, असा विचार त्यांच्या डोक्यात घोंगावू लागला, असं माझ्या मुलाने घरी आल्यावर सांगितले. पण त्याचवेळी त्यांच्यावर केस टाकू नका असे तुम्ही फर्मान काढल्यावर त्या मुलांचा जीव भांड्यात पडला.

काय सांगू तावडे गुरूजी, आता माझा मुलगा आणि त्याच्या विद्यार्थी मित्रांनी तावडे काय कोणत्याच मंत्र्याच्या विरोधात बोलायची हिम्मत करायची नाही, असं ठरवलंय. माझ्या मुलगा, अगदी काकुळतीला येऊन सांगत होता- मंत्र्यांविरोधात बोललो तर शहरी नक्सली म्हणून चार्जेस लावले जातील किंवा देशद्रोही म्हणून आरोप ठेवले जातील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे. असा दरारा राहिला तरच सगळे ताळ्यावर येतील आणि तरच सरकार चालवता येईल, असे मला वाटते. ‘पहिला देश, नंतर पक्ष सर्वात शेवटी स्वतःला स्थान, असे आपल्या भारतीय जनता पार्टीचे धोरण आहे आणि त्याचं तुम्ही पालन करता आहात. अभिनंदन तुमचं!
आता माझा मुलगा थोडा कुठे लाईनवर आला आहे. घरी आल्यावर पाठीवरची बॅग काढून नीट टेबलावर ठेवतो (पूर्वी तो बॅग बेडवर टाकून झोपायचा. आता तसं काही करत नाही) आणि आईला विचारतो ‘आई, जरा माझी पाठ शेकवते का?’.. मग ती माऊली त्याची पाठ शेकवता शेकवता चार गोष्टी शिकवते आणि माझं पोर तिला म्हणतो ‘आई, काही तरी विनोद करू नकोस..’ त्यावेळी आम्ही सर्वजण मोठ्याने न हसता मुका मार खाल्ल्यासारखं गालातल्या गालात हसत असतो..

पत्र नजरेखालून गेलं तर माझ्या लेकरासाठी दोन शब्द लिहा. बरं वाटेल त्याला म्हणून ही विनंती.
                                                                                                    आपला..

                                                                                  गाडीत कोंबून ठेवलेल्या मुलाचा बाप”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content