HomeArchiveखरंच आचारसंहिता भंग...

खरंच आचारसंहिता भंग होतोय का मोदी नि शाहंकडून?

Details
खरंच आचारसंहिता भंग होतोय का मोदी नि शाहंकडून?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान नरेंद्र मोदी नि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख अमित शाह यांच्यासंदर्भात निवडणूक आयोगानं सहा मेपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी दिले आहेत. भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून विरोधक सर्व ‘हथकंडे’ वापरताना दिसत आहेत. एका मुलाखतीत सोनिया बाई म्हणाल्या होत्याच, जे करता येईल ते करून मोदींना रोखणार! हे होईल तुमच्याकडून, पण लोकांवरील ‘गारूड’ कमी कसे करणार? या पद्धतीने ते नाही कमी होणार. जी कामं केली, लोकांना भावलीत त्यावर मतदान होताना दिसते. मात्र, गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी नि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून आचारसंहिता भंग होत असल्याची याचिका विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोग कारवाई करत नाही हा आक्षेप यात घेतला गेलाय, त्यांची उमेदवारी रद्द करावी ही मागणीही केलीय. दरम्यान, आतापर्यंत आयोगानं मोदींच्या तीन भाषणांना क्लीन चिट दिलीय. यात बाडमेरच्या न्यूक्लियर बटण भाषणाचा समावेश आहे.

अ. भा. महिला काँग्रेस अध्यक्ष नि आसामच्या सिल्चर क्षेत्राच्या खासदार सुष्मिता देव यानी आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. पण, कारवाई न झाल्याने याचिका केली. आयोगाने कारवाई न करण्यामागे कारणं काय ते सांगावं, न्यायालयानं तसे निर्देश द्यावेत, असं म्हणत हे दोघेही आचारसंहितेच्या कक्षेबाहेर आहेत का, अशी विचारणा केलीय. एकीकडे आयोग प्रत्येकावर कारवाईचा बडगा उगरताना दिसत आहे, हे पाहता या दोघांवर कारवाई होत नाही हा आरोप पचनी पडत नाही. आयोगानं मायावती, योगी आदित्यनाथ, आजमखान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, यांसह अनेकांवर कारवाई केली हे देशानं पाहिलं.

या दोन्ही नेत्यांनी तीन महत्त्वपूर्ण बाबींवर आचारसंहितेचे व्यापक उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मतांचं ध्रुवीकरण, प्रचारात सैन्य दलांचा उल्लेख करणं, मतदानाच्या दिवशी सभा घेणे याचा उल्लेख या याचिकेत आहे. पंतप्रधान मोदींच्या वर्धा येथील एक एप्रिलच्या सभेत केलेलं भाषण असं – ज्याला काँग्रेसने आतंकवादी म्हंटलं तो आता समजून चुकलाय, शांतीप्रिय हिंदू समाजाला, पूर्ण जगाला कुटूंब समजणाऱ्या समाजाला दहशतवादी म्हंटलंय. याच कारणानं बहुसंख्य भागातून अल्पसंख्याक भागातील निवडणूक जागेत शरणागती घेण्यास विवश व्हावे लागले. आमच्या पाच हजार वर्षांहून जुन्या संस्कृतीला बदनाम करण्याचं पाप काँग्रेसने केलंय. तुम्हीच सांगा ‘हिंदू आतंकवाद’ शब्द ऐकल्यावर मोठा धक्का बसला कि नाही? हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी कधी आतंकी घटना केल्या नाहीत. हिंदू हिंसक असल्याचा उल्लेख इंग्रजांनीदेखील केलेला नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या न्यायालयाच्या निकालाने काँग्रेसचे षडयंत्र देशापुढे आलं आहे. काँग्रेसने हिंदूंचा जो अपमान केलाय, जगभरात हिंदूंना कमीपणानं उल्लेखलंय अशा काँग्रेसला माफ करता येणार नाही.

नांदेड, महाराष्ट्र ६ एप्रिल

अमेठीप्रमाणे केरळच्या वायनाड येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल केल्याबद्दल त्यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, काँग्रेसच्या नामदारांनी मायक्रोस्कोप घेऊन अशी जागा निवडलीय की जिथं ते लढण्याची ताकद दाखवू शकतात. जागा पण अशी की जिथे देशाची बहुसंख्य जनता अल्पसंख्य आहे.

लातूर, महाराष्ट्र एप्रिल ९

मी माझ्या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना विचारू इच्छितो, आपलं पहिलं मत पाकिस्तानच्या बालकोटमध्ये हवाई हल्ला चढविणाऱ्या वीर जवानांच्या नावे समर्पित करू शकता का? पुलवामात जे वीर शहीद झालेत त्यांच्या नावे आपलं मत समर्पित होईल का?

पाटण, गुजरात एप्रिल २१

एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की मोदीने बारा क्षेपणास्त्र (मिसाईल) तयार ठेवलीत, हल्ला होऊ शकतो, स्थिती बिघडेल. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने घोषणा केली. जर पाकिस्तानने अभिनंदनला परत पाठवलं नसतं तर ती, ‘कत्ल की रात’ असती. आम्ही पत्रकार परिषद घेऊन आग्रह धरला की, आमच्या पायलटला काही झालं तर तुम्ही जगभरात सांगत सुटाल मोदीने तुमच्याबरोबर काय केलं ते! काँग्रेसच्या नेत्यांना सेनेवर भरोसा नाही. उरी, पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं सैन्याला मोकळीक दिली. आधी सर्जिकल स्ट्राईक, नंतर एअर स्ट्राईक करून अतिरेकी अड्डे नष्ट केले. सेनेच्या या कारवाईबद्दल काँग्रेस नेते पुरावे मागतात.

बाडमेर, राजस्थान एप्रिल २१

भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे सोडून दिले, नाही तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी बोलत होते, आमच्याकडे न्यूक्लियर बटन आहे. मग, आमच्याकडं काय आहे? आम्ही काय ते दिवाळीसाठी ठेवलेत का?

वाराणसी, उत्तर प्रदेश एप्रिल २५

पुलवामात त्यांनी आमच्या ४० जवानांना शहीद केलं. या हल्ल्यानंतर याच क्षेत्रात आम्ही ४२ दहशतवादी वर धाडले. ही आमच्या कामाची पद्धत आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही केलेली वक्तव्यं काँग्रेसने पुढे करीत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. काय आहेत ती पाहू पुढे..

नागपूर, महाराष्ट्र एप्रिल ९

राहुलबाबा आपल्या आघाडीसाठी केरळमधील अशा जागेवर उभे आहेत की, माहितीच पडत नाही जी मिरवणूक निघते ती जागा पाकिस्तानात आहे की भारतात!
मोदी सरकार आलं, अलीकडे पाकिस्तानने पाठवलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामात हल्ला केला. पूर्ण भारतात हताशा, निराशा पसरली; चीड, संताप होता. पण हे मौनी बाबा, मनमोहन सरकार नव्हतं, नरेंद्र मोदी सरकार, भाजप सरकार होतं. शहिदांच्या तेराव्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला चढवून त्यांना नेस्तनाबूत केले. पाकिस्तानला कणखर उत्तर देण्याचं काम भाजपच्या मोदी सरकारनं केलं.

राहुलबाबा, तुम्हाला आतंकवादयांबरोबर ‘इलू इलू’ करायचं असेल तर करा, हे भाजप सरकार आहे. तिथून गोळी आली तर इथून गोळा सुटेल, ‘इट का जबाब पत्थर से दिया जाएगा’.
पश्चिम बंगालच्या कृष्णानगर एप्रिल २२ रोजीचे भाषणही वरीलप्रमाणेच होतं. त्यातही हवाई दलाच्या कारवाईचं कौतुक केलं गेलं. पुलवामा हल्ल्याचं वर्णन होतं.

यावरून समाजमाध्यमांसह सर्वत्र चर्चा झाली, विरोधी पक्षानं तक्रारी केल्या निवडणूक आयोगानं स्पष्ट निर्देश देऊनही मोदी, शाह यांनी सेना, शहीदांचा उल्लेख आपल्या भाषणात केला, मतं मागितली. यात भाजपला मत द्या असा स्पष्ट इशारा, आवाहन कुठेही नाही. या दोघांनी मोजून मापून शब्द वापरलेत. आपण मत समर्पित करू शकता? असं विचारत मतदारनांच आपल्या समजेनुसार निर्णय घेण्यास सांगितलं आहे. विवादास्पद बाबीही अशा सांगितल्या की नियम उल्लंघनच्या आरोपातून सुटले पाहिजे. यामुळे पुढील काळात काय निर्णय होतो याकडे देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं खरंच उमेदवारी रद्द व्हावी दोघांची, अशी विधानं ते सत्ता येण्यासाठी करतील?”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content