HomeArchiveइतिहास तुम्हाला विसरणार...

इतिहास तुम्हाला विसरणार नाही!

Details
इतिहास तुम्हाला विसरणार नाही!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
मतदानोत्तर चाचण्यांमधून अतिंम निकालाचे जे अनुमान जाहीर झाले आहे त्यामुळे देशाच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे आणि त्यातूनच गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीची उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. बहुधा नरेंद्र मोदी हेच देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. त्यावेळी त्यांना आपल्या आधी या पदावर काम केलेल्यांचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. यावेळी ते राजीव गांधींविषयी काय विचार करतील असा एक प्रश्न राजीव गंधींच्या स्मृतीदिनी मनात तरळून जातो. राजीव यांच्याविषयी मोदींनी प्रचाराच्या जोशात काही शब्द वापरले होते ते काँग्रेसेच्या विशेषतः नेहरू-गांधी कुटुंबियांच्या अगदी जिव्हारी लागले होते. पण मोदींच्या बोलण्यात तथ्य नव्हते असेही नाही.

राजीव गांधींनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ते मिस्टर क्लीन होते आणि जेव्हा त्यांचे बलिदान झाले तेव्हा मात्र त्यांच्याविरोधातील बोफोर्स तोफा खरेदीच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची संसदीय चौकशी सुरू होती. सीबीआयने ते प्रकरण हातात घेऊन काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. त्यात राजीव गांधींच्या सासुरवाडीशी संबंधित मंडळीही होती. काहींना देशाबाहेर पळण्यात काँग्रेस सरकारने मदत केल्याचाही ठपका होता. बोफोर्सचा डाग माथी घेऊनच राजीव निजधामास गेले हे खरे होते. पण हेही खरे आहे की हायकोर्टाने राजीव गांधींना निर्दोष घोषित केले होते. संयुक्त संसदीय समितीलाही आरोपात तथ्य आढळले नव्हते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालांतराने जेव्हा बोफोर्सच्या तोफा प्रत्यक्ष युद्धात वापरल्या गेल्या तेव्हा त्यांच्या क्षमतेचे जगातील सर्वोत्तम तोफा असे वर्णन भाजपच्याच नेत्यांना करावे लागले होते.

अटलबिहारी वाजपेयींचे संरक्षण मंत्री व परराषट्रमंत्री राहिलेले जसवंत सिंह यांनी कारगील युद्धानंतर याच बोफोर्स तोफांमुळे सफलता मिळाली हे नमूद केले होते. म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणताही आरोप सिद्ध न होताही राजीव गांधींना भ्रष्टपणाचा डाग लागला तो कायमचाच. हे त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पण इतिहास त्या चष्म्यातून भारताच्या इतिहासातील या सर्वात तरूण अशा पंतप्रधानांकडे पाहणार नाही हे नक्की. राजीव गांधी यांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत शांत व सुशील होते. त्यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात कोणाबद्दल कधीही अपशब्द न वापरता शांत वृत्तीने आपले मत मांडले, अशी राजीव गांधी यांची ख्याती होती. त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द यशस्वी होती की नव्हती यावर इतिहासकार वाद घालू शकतील. पण एका अत्यंत विचित्र परिस्थितीत त्यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली गेली. नव्हे त्यांना नको नको म्हणत असताना ते पद काँग्रेस नेत्यांनी घ्यायला लावले आणि एकदा पद घेतल्यानंतर ते निष्ठेने झोकून देऊन काम करत राहिले.

ते अनुनभवी होतेच. त्यामुळे त्यांच्याकडून काही चुका नक्कीच झाल्या असतील. पण त्यांनी देशाला सर्वात प्रथम आधुनिक युगाचा मंत्र दिला यात शंकाच नाही. २१ व्या शतकाकडे चला हा त्यांचा संदेश देशाच्या तरूणाईला भुरळ पाडणारा होता. त्यांनी आणलेल्या तांत्रिक सुधारणांमुळे देश मोदी युगासाठी सज्ज झाला हे मोदींनाही मान्यच कारावे लागेल. इंदिराजींच्या दुर्दैवी हत्त्येनंतर भारतामध्ये उद्‌भवलेली परिस्थिती आणि त्या संकटकाळात पंतप्रधानपदाची अवघड धुरा त्यांना स्वीकारावी लागली. एकविसाव्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण व सामाजिक न्याय याबाबतीत जगाच्या नकाशावर भारत सदैव अग्रक्रमाने राहवा, म्हणून राजीव गांधी यांनी जीवाचे रान केले. अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ व विद्वानांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने संगणक, दळणवळण, मोबाइल व इंटरनेटची क्रांती घडवून आणली. त्यांचा चेहरा प्रसन्न होताच, पण द्वेष, राग या शब्दांना त्यांच्याजवळ थाराही नव्हता असे त्यांच्यासमवेत निकटतेने वावरलेले उल्हासदादा पवारांसारखे जुनेजाणते काँग्रेसचे नेते सांगतात.

इंदिराजींची हत्त्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. शिखांचे शिरकाण झाले. त्यावेळेचे राजीव यांचे काही उद्गार २०१९ च्या निवडणूक प्रचारातही समाजमाध्यमांतून झळकावले गेले हा राजीव यांच्यावर अन्यायच होता. वटवृक्ष कोसळतो तेव्हा धरणी हादरते असे ते बोललेच होते, पण शिखविरोधी उद्रेक, दंगली शमवण्यासाठी प्रयत्न करणे, लोकांशी बोलणे, सुरक्षायंत्रणांना मार्गदर्शन करणे हेही त्यांनी केले होते. आपल्या आईच्या मृतदेहापासून दोन-तीन वेळा दूर जाऊन त्यांनी दंगली शमविण्याचा व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, हे मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे असे उल्हासदादा सांगतात. इंदिराजींच्या अंत्यविधीनंतर एका आठवड्यातच शीख पंथाचे प्रमुख असलेले संत लोंगोवाल यांच्याशी शांततेचा व सामंजस्याचा करार त्यांनी केला. या कराराच्या पाठीशी समस्त भारतीयांनी उभे राहवे व त्याचे समर्थन करावे, असे आवाहन थोर स्वातंत्र्यसेनानी अच्युतराव पटवर्धन, समाजवादी नेते एस. एम. जोशी व इतर अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही केले.

सध्याच्या भाजपाच्या नेत्यांचे गुरू अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल ‘फार मोठ्या मनाचा माणूस’, असे उद्गार काढले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल राजीव गांधी यांना समजले तेव्हा अमेरिकेला जाणाऱ्या सरकारी शिष्टमंडळात त्यांनी अटलजींना पाठवले आणि सांगितले की तुमच्या प्रकृतीची तपासणी करून घ्या, आवश्यक ते उपचार करून घ्या व ऑपरेशन करावे लागले, तर तेही करा. याची सर्व काळजी भारत सरकार घेईल. तेव्हा राजीव गांधींच्या माणुसकीचे व आपुलकीचे दर्शन सर्व भारतीयांना झाले. तंत्रज्ञान, विज्ञान, संगणक, इंटरनेट, आंतरराष्ट्रीय संशोधन, दळणवळण, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण, युवकांना शैक्षणिक व जगातील कुठल्याही तंत्रज्ञानापासून दूर न ठेवता योजना आखण्यासाठी घेतलेले परिश्रम, नवभारताच्या अखंडत्वाचा ध्यास, शेती व अर्थकारणामध्ये स्वयंपूर्णता व मानवी विकासाचा दर हा नेहमी अग्रक्रमाने पुढे जावा, यासाठी वाहिलेली काळजी आणि जगात भारतीयांनी कोठेही मागे राहता कामा नये, यासाठी अनेक विद्वानांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल हे राजीव यांच्या पंतप्रधानकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

त्यांच्या कारकीर्दीतील ज्या ठळक चुका असे म्हणावे लागेल त्यात श्रीलंकेतील यादवी युद्धात त्यांनी सिंहलींच्या सरकारच्या मदतीला व तामिळी बंडखोरांच्या दमनासाठी लष्कर पाठवले ही एक मोठी चूक होती. त्याची किंमत शेवटी राजीव यांना स्वतःचा जीव देऊनच चुकवावी लागली. त्यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांबरोबर करार केला आणि तिथे शांतीसेना धाडली. १९९१च्या निवडणूक प्रचारावेळी त्यांना एलटीटीईच्या दहशतवाद्यांपासून असणाऱ्या धोक्याबाबत सुरक्षायंत्रणांनी इशारा दिला होता. तामिळनाडूत प्रचारासाठी जाऊ नका असेही बजावले होते. तरीही जुन्या निष्ठावान काँग्रस नेत्याच्या कन्येच्या प्रचारासाठी राजीव श्रीपेरूंबुद्दूर इथे गेलेच आणि २१ मेच्या रात्री उशिरा तमिळी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी स्फोटात त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या. आज राजीव यांचे पुत्र राहुल पित्याने, आजीने व पणजोबांनी भूषवलेल्या पंतप्रधानपदावर बसण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांना अद्याप पुष्कळ मजल मारावी लागणार आहे. पण त्यांनी विद्यमान पंतप्रधानांना सतत चौकीदार चोर है असे जे हिणवले त्याचेच उट्टे काढण्याच्या भरात मोदींनी राजीव गांधींना सर्वात भ्रष्ट पंतप्रधान ठरवले हेही अतिशय अन्यायाचे होते.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content