HomeArchiveआचारसंहितेपूर्वी मागाठाणेत २०...

आचारसंहितेपूर्वी मागाठाणेत २० कोटी कामांच्या लोकार्पणाची लगबग

Details
आचारसंहितेपूर्वी मागाठाणेत २० कोटी कामांच्या लोकार्पणाची लगबग

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागणार असल्याने जवळजवळ सर्वच विद्यमान आमदार त्यांच्या आमदार निधीतून केलेल्या कामांच्या लोकर्पण, भूमिपूजन सोहळ्यात गुंतले आहेत. मुंबईतल्या मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मतदारसंघातील कांदिवली पूर्व, बोरीवली पूर्व व दहिसर पूर्व या परिसरात केलेल्या २० कोटींच्या विविध कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण नुकतेच उत्साहात केले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
आमदार फंडासह अल्पसंख्य विकास निधी, जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, सामाजिक न्याय, म्हाडा व एमएमआरडीए आदींकडून अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांद्वारे विकासनिधी मंजूर करून घेतल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली. दहिसर पूर्व, केतकी पाडा येथे बिस्मिल्ला चाळ, हनुमान टेकडी, काजू पाडा येथील लालता प्रसाद चाळ येथे संरक्षक भिंत बांधून देण्यात आली. दहिसर पूर्व येथील नवजीवन मित्रमंडळ, वाघदेवी नगर, सार्वजनिक उत्सव मंडळ, गोकुळनगर रहिवासी संघ, जयमाता अंबे मंदिर, देवीपाडा व बोरिवली येथील शिवशक्ती संस्था येथे सभामंडप बांधून देण्यात आले. कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज येथील सिंह इस्टेट व अलकनंदा सोसायटीतील रस्त्यांची दुरूस्ती व डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
दहिसर पूर्व भागात रावळपाडा, बोरिवली पूर्व भागात रामेश्वर वेल्फेअर सोसायटी, शिवानंद पांडे चाळ (हनुमान टेकडी), सत्यमेव चाळ (संतोष नगर), म्हात्रे चाळ, मायकल वाडा, भोसले मैदानाजवळ आणि कांदिवली पूर्व येथील खटाववाडी (टाटापॉवर हाऊस), सिंह इस्टेट, नरसी पाडा, जीवालपाडा आदी विविध भागांमध्ये शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील समर्थ कृपा, आकुर्ली रोड तसेच पवन नगर, दहिसर पूर्व रावळपाडा येथील राजगड इमारत व सरस्वती रिव्हर पार्क, हायवेलगत निर्मल इमारत, घरटन पाडा येथील पुष्पक सोसायटी, कोकणी पाडा येथील भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभिकरण करण्यात आले. यापैकी काही कामांना प्रशासनाची मंजुरी मिळाल्यावर आचारसंहितेपूर्वी येथील विविध विकासकामांना सुरूवात झाली असून आचारसंहितेनंतरदेखील ही कामे सुरू राहतील आणि येत्या महिन्याभरात ती पूर्ण होतील असा विश्वासही आमदार सुर्वे यांनी व्यक्त केला.
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागणार असल्याने जवळजवळ सर्वच विद्यमान आमदार त्यांच्या आमदार निधीतून केलेल्या कामांच्या लोकर्पण, भूमिपूजन सोहळ्यात गुंतले आहेत. मुंबईतल्या मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मतदारसंघातील कांदिवली पूर्व, बोरीवली पूर्व व दहिसर पूर्व या परिसरात केलेल्या २० कोटींच्या विविध कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण नुकतेच उत्साहात केले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
 
“आमदार फंडासह अल्पसंख्य विकास निधी, जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, सामाजिक न्याय, म्हाडा व एमएमआरडीए आदींकडून अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांद्वारे विकासनिधी मंजूर करून घेतल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली. दहिसर पूर्व, केतकी पाडा येथे बिस्मिल्ला चाळ, हनुमान टेकडी, काजू पाडा येथील लालता प्रसाद चाळ येथे संरक्षक भिंत बांधून देण्यात आली. दहिसर पूर्व येथील नवजीवन मित्रमंडळ, वाघदेवी नगर, सार्वजनिक उत्सव मंडळ, गोकुळनगर रहिवासी संघ, जयमाता अंबे मंदिर, देवीपाडा व बोरिवली येथील शिवशक्ती संस्था येथे सभामंडप बांधून देण्यात आले. कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज येथील सिंह इस्टेट व अलकनंदा सोसायटीतील रस्त्यांची दुरूस्ती व डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.”
 
 
“दहिसर पूर्व भागात रावळपाडा, बोरिवली पूर्व भागात रामेश्वर वेल्फेअर सोसायटी, शिवानंद पांडे चाळ (हनुमान टेकडी), सत्यमेव चाळ (संतोष नगर), म्हात्रे चाळ, मायकल वाडा, भोसले मैदानाजवळ आणि कांदिवली पूर्व येथील खटाववाडी (टाटापॉवर हाऊस), सिंह इस्टेट, नरसी पाडा, जीवालपाडा आदी विविध भागांमध्ये शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील समर्थ कृपा, आकुर्ली रोड तसेच पवन नगर, दहिसर पूर्व रावळपाडा येथील राजगड इमारत व सरस्वती रिव्हर पार्क, हायवेलगत निर्मल इमारत, घरटन पाडा येथील पुष्पक सोसायटी, कोकणी पाडा येथील भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभिकरण करण्यात आले. यापैकी काही कामांना प्रशासनाची मंजुरी मिळाल्यावर आचारसंहितेपूर्वी येथील विविध विकासकामांना सुरूवात झाली असून आचारसंहितेनंतरदेखील ही कामे सुरू राहतील आणि येत्या महिन्याभरात ती पूर्ण होतील असा विश्वासही आमदार सुर्वे यांनी व्यक्त केला.”

 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content