HomeArchiveअलक..

अलक..

Details
अलक..

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
सदानंद खोपकर
संपादक, सा. मावळमराठा
sadanandkhopkar@gmail.com
 
 
अलक.. म्हणजे अति लघु कथा. अलीकडेच विकसित झालेला एक साहित्य प्रकार..
 
हिममानव..
 
उत्तुंग हिमशिखर सर केल्याचा पुरावा म्हणून टिपलेलं छायाचित्र त्यानं रवाना केलं. हिमवर्षाव भुरभुरत होताच. तो व त्याचा सहकारी सुरक्षित अंतर राखून उलट मागेमागे येत असतानाच, हिमवर्षाव वाढला. वेगाने तो कड्याच्या दुसऱ्या टोकास घसरत गेला. सावरण्याचा आटोकाट प्रयत्नात होत असतानाच, मृत्यू दुसऱ्या रूपात समोर दिसला. काही फुटांवर विशाल नखशिखान्त केसाळ मानवाकार स्थिर होता. फक्त त्याचे बारीक तीक्ष्ण डोळे लुकलुकत होते. आपण काय पाहतोय यावर त्याचा विश्वासच बसेना. तो, ते ‘येती’, हिममानव? एकटक दृष्टिभेट घेत तो प्रचंड मानवाकार लांब पावलं टाकत अदृश्य झाला. बर्फावर प्रचंड ठसे मागे ठेऊन.
 
 
 
मनात फुललं!
 
घराच्या आनंदावकाशातलं चांदणं रूसलं होतं. चार दिवस होऊन गेले, घर दिवसा अंधारल्यागत झालेलं. टी-पॉयवर चहाचा कप, पाण्याचा पेला येत नव्हता. बाथरूममध्ये दांडीवर टॉवेल दिसणं बंद! ‘टीव्ही निरर्थक किंचाळत होता अन् किचनमध्ये भांडी वेळोवेळी आपसात भा़ंडत होती. चार दिवस चार युगांसारखे उलटले. पाचव्या दिवशी टि-पॉयवर चहा-पाणी अवतरलं. टॉवेलही दांडीवर दाखल. दबकत किचनमध्ये कानोसा घेतला. भांडी वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांसारखी शांत!’
ऑफीसमध्ये जायला पाऊल बाहेर टाकलं, मागून आकाशवाणीगत शब्द उमटले..
‘अहो!’
अन् काय सांगू, दिवसा मनात फुललं!
 
 
  
अवतार..
 
एका पायावर उड्या मारीत त्या वृद्धाने गावातला चौक गाठला. खांबावरच्या भव्य फलकाकडे एकटक पाहू लागला. हार घातलेल्या तरूण मुलाचं छायाचित्र होतं ते. त्याच्या डोळ्यांतून आसवे वाहू लागली. मान थरथरू लागली. एसटीची वाट पाहणाऱ्याने त्याला थोपटत विचारलं..
कोण होता हा?
माझ्या मुलाचा अवतार!.. तो म्हणाला.
‘दचकलेल्या त्याने विचारलं.. 
अवतार?
तो म्हणाला..
“”हो,पाच वर्षापूर्वी माझा मुलगा ओढ्यात वाहून गेला. तेव्हापासून याच्यात त्याला पाहत होतो. परवा हा अपघातात गेला. अवताराची समाप्ती झाली. आता मला कोणी नाही!””
 
 
 
कोलाहल..
 
तिघे झाडाखाली निवांत. एकाचे डोळ्यांवर, दुसरा तोंडावर, तर तिसऱ्याचे कानावर हात. काही वेळांनी तीन दिशांनी जात राहिले. ते कोलाहलात प्रवेशले. पहिल्याने आक्रोश ऐकून पाहिलं. खूप लोक एकट्याला हाणतायत. बोबडी वळलेल्या त्याचे हात नकळत तोंडावर गेले. दुसरा धावत्या बसच्या टपावरून आत, कोलाहलात डोकावला. कानाला काही लावून खूप लोक किंचाळत होते. दचकून त्याने हात कानावर दाबले. झुकल्या फांदीवरून तिसरा एका खिडकीकडे.. एक स्री आक्रोश करतेय आणि दांडगट अत्याचार करू पाहतोय..
चित्कारतच त्यानं झाडाचं फळ भिरकावलं. पाप फळाला भेदरलं, पळालं.
जे पाहिलं त्याने आपसूकच हात डोळ्यांवर गेले. कोलाहलातून तिघे झाडाखाली परतले. शेपट्या एकविचारे हलवित, तो म्हणत होता..
`’माकडच राहिलो तेच ठिक!””
 
 
अन् टाळीत सामावलं..
 
अर्धांगवायूमुळे चेतनाहीन हात कुरवाळत ती वृद्धा म्हणाली..
‘हा बाबू झालाय, नुसता!’
धड असता तर पूजेची सारी तयारी करून दिली असती. उदासीनता झटकत एकाच हाताने तुलसी-बेल निवडली. फुलांची ताटं सजवली तिनं. हळूहळू गोकूळ जमलं तसं आनंदली.
बाबू हातावरच टाळी देत आरतीतही सहभाग दिला. रात्रीपर्यंत सारं गोकूळ रितं झालं. शांत तृप्तीने झोपी गेली. उत्तरपूजेची आरती आटोपता शेवटच्या टाळीला पुटपुटली..
‘आता पुढच्या वर्षी पूजेला सारी जमतील!’
जणू सारं वर्ष तिच्या टाळीत सामावलं होतं.”

 

 
 
 
सदानंद खोपकर
“संपादक, सा. मावळमराठा”
sadanandkhopkar@gmail.com
 
 
अलक.. म्हणजे अति लघु कथा. अलीकडेच विकसित झालेला एक साहित्य प्रकार..

 
हिममानव..
 
“उत्तुंग हिमशिखर सर केल्याचा पुरावा म्हणून टिपलेलं छायाचित्र त्यानं रवाना केलं. हिमवर्षाव भुरभुरत होताच. तो व त्याचा सहकारी सुरक्षित अंतर राखून उलट मागेमागे येत असतानाच, हिमवर्षाव वाढला. वेगाने तो कड्याच्या दुसऱ्या टोकास घसरत गेला. सावरण्याचा आटोकाट प्रयत्नात होत असतानाच, मृत्यू दुसऱ्या रूपात समोर दिसला. काही फुटांवर विशाल नखशिखान्त केसाळ मानवाकार स्थिर होता. फक्त त्याचे बारीक तीक्ष्ण डोळे लुकलुकत होते. आपण काय पाहतोय यावर त्याचा विश्वासच बसेना. तो, ते ‘येती’, हिममानव? एकटक दृष्टिभेट घेत तो प्रचंड मानवाकार लांब पावलं टाकत अदृश्य झाला. बर्फावर प्रचंड ठसे मागे ठेऊन.”
 
 
 
मनात फुललं!
 
“घराच्या आनंदावकाशातलं चांदणं रूसलं होतं. चार दिवस होऊन गेले, घर दिवसा अंधारल्यागत झालेलं. टी-पॉयवर चहाचा कप, पाण्याचा पेला येत नव्हता. बाथरूममध्ये दांडीवर टॉवेल दिसणं बंद! ‘टीव्ही निरर्थक किंचाळत होता अन् किचनमध्ये भांडी वेळोवेळी आपसात भा़ंडत होती. चार दिवस चार युगांसारखे उलटले. पाचव्या दिवशी टि-पॉयवर चहा-पाणी अवतरलं. टॉवेलही दांडीवर दाखल. दबकत किचनमध्ये कानोसा घेतला. भांडी वर्गातल्या हुषार विद्यार्थ्यांसारखी शांत!'”
“ऑफीसमध्ये जायला पाऊल बाहेर टाकलं, मागून आकाशवाणीगत शब्द उमटले..”
‘अहो!’
“अन् काय सांगू, दिवसा मनात फुललं!”
 
 
  
अवतार..
 
एका पायावर उड्या मारीत त्या वृद्धाने गावातला चौक गाठला. खांबावरच्या भव्य फलकाकडे एकटक पाहू लागला. हार घातलेल्या तरूण मुलाचं छायाचित्र होतं ते. त्याच्या डोळ्यांतून आसवे वाहू लागली. मान थरथरू लागली. एसटीची वाट पाहणाऱ्याने त्याला थोपटत विचारलं..
कोण होता हा?
माझ्या मुलाचा अवतार!.. तो म्हणाला.
‘दचकलेल्या त्याने विचारलं.. 
अवतार?
तो म्हणाला..
“””हो,पाच वर्षापूर्वी माझा मुलगा ओढ्यात वाहून गेला. तेव्हापासून याच्यात त्याला पाहत होतो. परवा हा अपघातात गेला. अवताराची समाप्ती झाली. आता मला कोणी नाही!”””
 
 
 
कोलाहल..
 
“तिघे झाडाखाली निवांत. एकाचे डोळ्यांवर, दुसरा तोंडावर, तर तिसऱ्याचे कानावर हात. काही वेळांनी तीन दिशांनी जात राहिले. ते कोलाहलात प्रवेशले. पहिल्याने आक्रोश ऐकून पाहिलं. खूप लोक एकट्याला हाणतायत. बोबडी वळलेल्या त्याचे हात नकळत तोंडावर गेले. दुसरा धावत्या बसच्या टपावरून आत, कोलाहलात डोकावला. कानाला काही लावून खूप लोक किंचाळत होते. दचकून त्याने हात कानावर दाबले. झुकल्या फांदीवरून तिसरा एका खिडकीकडे.. एक स्री आक्रोश करतेय आणि दांडगट अत्याचार करू पाहतोय..”
“चित्कारतच त्यानं झाडाचं फळ भिरकावलं. पाप फळाला भेदरलं, पळालं.”
“जे पाहिलं त्याने आपसूकच हात डोळ्यांवर गेले. कोलाहलातून तिघे झाडाखाली परतले. शेपट्या एकविचारे हलवित, तो म्हणत होता..”
“`’माकडच राहिलो तेच ठिक!”””

 
 
अन् टाळीत सामावलं..
 
अर्धांगवायूमुळे चेतनाहीन हात कुरवाळत ती वृद्धा म्हणाली..
“‘हा बाबू झालाय, नुसता!'”
धड असता तर पूजेची सारी तयारी करून दिली असती. उदासीनता झटकत एकाच हाताने तुलसी-बेल निवडली. फुलांची ताटं सजवली तिनं. हळूहळू गोकूळ जमलं तसं आनंदली.
बाबू हातावरच टाळी देत आरतीतही सहभाग दिला. रात्रीपर्यंत सारं गोकूळ रितं झालं. शांत तृप्तीने झोपी गेली. उत्तरपूजेची आरती आटोपता शेवटच्या टाळीला पुटपुटली..
‘आता पुढच्या वर्षी पूजेला सारी जमतील!’
जणू सारं वर्ष तिच्या टाळीत सामावलं होतं.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content