HomeArchiveअबकी बार मोदी...

अबकी बार मोदी सरकार?

Details
अबकी बार मोदी सरकार?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]

रामराम हो सरपंच सायेब, लोकं राजा हिवाच्यानं घराच्या भाहिर निग्याले मांगपुळे करतात अन तुमी खुशिनाम वट्यावर बसून पेपर वाचून रायले. काल गेल्ते ना काटनमार्केटात, काय मन्ते हाल हवाल! कापसाचा भाव वाढनार हाय की नायी सायाचा?

गेल्तो गळ्या रामदास पन कापसाचं कायी सांगता येत नायी सध्यास. आता सोयाबीनचे भाव वाढेल हायेत. अशीन सोयाबीन तं इकून टाक फटकन!

काय राजा तुमीबी मजाका करता मानसाच्या. कापूस हाय आता घरात मनूनशानी इचालं तुमाले. सोयाबीन रायते काय इतल्या दिवस. ते तं पोत्यात पळत नायी तं त्याच्यामांगं चेळे लागेल असतात. पोत्यात पळ्याचीच देरी असते. काऊन की, त्याच्यावरच सरा यव्हार असते. मंग कसं राईन इतल्या दिवस सोयाबीन घरात. पन सरकारचं काम बी लय बेकार असते हो राजा, जवा शेतकर्‍याचा माल घरी येते तवा बराबर भाव उतरवते. अन आपून इकटीक केला माल. बेपार्‍यायजोळ गेला की, मंग बराबर भाव वाढोते सरकार!

त्वालंबी बराबर हाय मना, पन जे बजारातली हवा हाय ते सांगतलं बॉ तुले. गुना मंगापासून काय करून रायला हो अठी? तुवं काय काम व्हतं रे गुना, मंगापासून बशेल हायेस लेका ठोम्यासारका. मन्लं गळ्या हा आता बोलीन मंग बोलीन!

तुमच्या दोघायचं चालू व्हतं बोलनं मनून बॉ आपून कहाले मंधात बोलाव, असं वाटलं मले!
झालं आता आमचं सांग काय म्हनतं?
दाखला पायजे व्हता राजा.

कहाचा दाखला पायजे बे तुले. घरपट्टी भरेल हाय काय ते सांग पयले तुनं? त्याच्याशिवाई कोनालेच दाखला देत नायी!
नायी राजा, तीन वर्सापासून रायेल हाय भर्‍याची.

मंग कसा भेटीन तुले दाखला. तसा नेमच काळेल हाय आपल्या ग्रामपंचायतनं. माईत नायी का तुले? पानी पट्टी, घरपट्टी भरतच नायीत लोकं. मंग ते लईनवाले प्याच्या पान्याच्या मोटरीचं मीटर काळून नेतात. दोन दिवस पानी नायी आलं की मंग बोंबलता लेकहो, सरपंचाच्या नावानं! आमी का आमच्या खिशातून भराव का आता सर्व्यायच्या घरपट्ट्या! सरपंच झालं मन्जे आता हे कामंबी करा लागतीन वाटते कायी दिसानं!

तसं नायी राजाभाऊ, रायली लेकाची भर्‍याची. ढोरं इक्याले नेऊन रायल्तो. पोलीस पाटील कायी घरी नायीत. त्यायच्या घरी गेल्तो दाखल्यासाटी. ते जायेल हायेत सासरवाळीले. पाहा बॉ देसान तं बरं व्हईन!

ते तुया पुळचं लेटर दे इकळे, त्यात सर्वे दाखले हायेत, आन दे बरं. ढोरं इक्याले चालोले, त्याचा पायजे ना तुले दाखला! हऽऽ हाऽऽ पाय सापळला. आपून सर्वे दाखले छापूनच आनेल हायेत सायाचे. झंझटमारीच नायी ठेवली कोनती. नाव टाकलं, सई केली की, झालं काम. कोन ठेवीन हो ते भनभन राजा लिव्याची! इतला टाईम कोनाजोळ हाय लिवत बशाले. त्वाले एकल्याचेच हायेत ना बे जनवारं? तुवंच नाव लिवतो मंग! गुणवंत रावसाहेब पंचभाई, किती हायेत रे ढोरं?

चार गायी हायेत, दोन वासर्‍या अन एक गोरा हाय!

सात जनवारं हायेत नायी का? बरं, हा घे दाखला. जाय झालं त्वालं काम. पन पयशे आले की ते घरपट्टी भरुन टाकजो, नाईतं पुळच्या टायमाले दाखला देनार नाई बरं, सांगून ठेऊन रायलो! तुमाले बरं गमते गळ्या डोक्शावर बोजा असला की! .. सरपंचाचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करून गुणवंत निघून गेला.
काय मन्ते हो पेपर सरपंच. रामदासभाऊ तं लयेच पेपरात घुसुन वाचून रायले लगे. पेपर फाडून अंदर जाता की का हो बावा! डोये कामातून गेले वाटते तुमचे आता. इतल्या वाकोल्या दाखोवून रायले पेपराले तं!
तसं नायी रे गळ्या परलाद. आता नजर लय कमी झाली. अपरेशन सांगेल हाय मले, मोतीबिंदू का काय असते त्याचं! पन आता कसं तरी धकोनं चालू हाये, एक-एक दिवस पुळे! मन्लं पयशे आले की, करुन टाकू!

डोयाच्या अपरेशनले पयशे कहाले लागतात हो राजा, सरकारी दवाखान्यात गेलं की, फुकट करुन देतात ते, तुमी शिनियर शिटीजनमधी येता ना, तुमाले तं एक नया पयसा नाई लागत बावा! व्हसान ना फुटके, करुन घ्या फटकन!
मले तं मायीतच नोतं गळ्या असं असते मनूनशानी! म्यानलं भक्कम पयशे लागत असतीन! मी काय दवाखान्यात गेल्तो का डोये तपाशाले, चष्म्याच्या दुकानात गेल्तो, तं त्यानच सांगतलं अपरेशनच!

हव का, चाला मंग सकायच माया सोबत, देतो तुमचं काम करुन. आपल्या वयखिचेच हायेत सरकारी दवाखान्यातले डाक्टर! लगे एकाचदिशी भरती कर्‍याले लावतो. अन दूसर्‍या दिवशी अपरेशनच!

तू गंज करशीन रे बावा, आंधी घरचं नायी पावा लागनार. घरची शेटींग लावतो आंधी ढोरा-वासरायची मंग जाऊ! हा हप्ता जाऊ दे गळ्या परलाद, पुळच्या हप्ती पाऊ!

सांगा ना हो कधीबी. मी कुठी चाललो पऊन. बरं ते जाऊ द्या कापूस हाय का तुमचा?

काऊन काय झालं? आता मी तेच इच्यार्‍याले आल्तो सरपंच सायेबाले. मन्लं भाव वाढनार हाय का कापसाचा?

गोटूभाई नायीत का कापसाचे बेपारी? त्यायनं जसं मले सांगून ठेवेल हाय की, बॉ सकाय त्यायचा टरक यीऊन रायला आपल्या गावात. कोनाचा कापूस इक्याचा अशीन तं इचारुन ठेवजो. म्यानलं पायतो बॉ, मनून तुमाले इचारलं. जो भायीर भाव अशीन त्याच भावानं घेनार हाय तो बॉ बी! अन पयशे नगदी! वरुन मापात वांदा नायी. बाकीचे कशे मापात दाबून देतात ना हो! इतलं कहाले, आपलं उरय झुरय हाये की नायी, तठोल्ली गोठ सांगतो मी तुमाले कालची!

तठोल्ल्या एका मानसाचा कापूस घेतला एका बेपार्‍यानं. त्या मानसाच्या कापसात जोळपास दीडक किंटल कापसाची घट आली. त्या मानसानं अशीन आंधीच कापूस मापेल. मंग कापूस कमी भरला कसा? तोबी दीड दोन किंटल. मंग बेपार्‍याची अन त्या मानसाची झाली झकमक! मंग बॉ बाकीच्या लोकायनं आवरलं. पन त्यानं हुशारी केली. कापूस टरकात टाकून घेतला व्हता आंधीच. मंग काय इलाज व्हता कोनाजोळ! लय झगळा झाला दोघायचा, पन तो बेपारी कहाचा आयीकते हो. अखरशेवटी नायीच देले त्यानं पयशे, जेवळा भरला तेवळेच देले अन गेला. असं व्हते ना नवाळा बेपारी असला की, हा मानूस तसा नायी. भरोशाचा मानूस हाय! फिरुन आपल्या थळीतला. कायीबी झालं तं आपून त्याच्या घरी जाऊ शकतो, तुमाले तं माईतच अशीन ना त्यायचं घर?
गोटू शेठचा नायी वांदा नायी. आपल्याले सर्वच मायीत हाये त्यायचं. दरसाल आपून त्यायलेच तं देतो कापूस!

मंग काय घायबर्‍याचं काम हाय, सांगतो मंग त्यायले तुमचं नाव रामदास मानेचा हाय बॉ मनून कापूस!

कायी मना राजा सरपंच, शेतकर्‍यायच्या मालाले भाव नायी राजा भेटत कयीच. दरसालची बोंब हाय. काटनमार्केटात गेलं की, अडते त्यायचं सरकं करून घेतात. हा टॅक्स तो टॅक्स, तोलाई, हमाली अमकं, टमकं. त्यात तोलाईची चिट्टी पायली की परेशान हून जाते शेतकरी, !

..रामदास माने म्हणाला.
अरे बावा रामदास, काल काटनमार्केटात व्हतो दिवसभर, हाल पाववल्या जात नायीत गळ्या शेतकर्‍यायचे. एका मानसानं तं तुले सांगतो, टरक भरून कांदा आनला अन त्याले भाव भेटला दीड रुपया किलो. वाहतूक खर्च, हमाली अन बाकीचा हिसोब केला तं मन्लं त्याच्या हातात एक नया पयसा उरला नायी. अडत्यानं हिसोब केला तं वरतून त्या शेतकर्‍याले खिशातले पाच रुपये त्या अडत्याले द्या लागले, सांग मंग, काय कराव त्या शेतकर्‍यानं!
कायी दिवस थांबा रामदासभाऊ, मोदी सरकार उत्पन्न दुप्पट करनार हाय शेतकर्‍यायचं. लय भलं व्हनार हाय पुळे पुळे आपलं. थोडा टाईम तं देवाच लागीन ना सरकारले काम कर्‍याले. आंधीच्या सरकारनं लय घोटाळे करेल हायेत, आंधीचे गड्डेच भुजून रायले आजून नरेंद्र मोदी. तुमी पाहा तं खरी, पुळे पुळे काय व्हते तं! आजलोक तं सर्वे घोटाळेच घोटाळे आयक्याले भेटत बावा. आता कसंयबी काम करनारं सरकार येल हाये. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सुट्टी घेत नायीत मंतात. असं आयीकलं बॉ म्या टीव्हीवर बातम्यायीत सांगत जात मांग तवा! याच्या आंधी असा पंतप्रधान पायला व्हता का कयी, इतलं काम करनारा! ..दीर्घ श्वास सोडत प्रल्हाद बेरके थांबला.
परलाद गळ्या या चार वर्सात तं मले एकबारही चांगला भाव भेटला नायी मालाले! आजलोक निरा बेभाव इकला माल म्या! लय आशेनं मोदीले मत देलं पन आता पसताऊन रायलो. आता तं अब की बार मोदी सरकार असं कोनं आजूबाजूनं म्हनलं तरी भेव लागते लेका! सरपंच हाव मनून दाखोता येत नायी! पन लय मातीत जायेल हाव लेका या चार वर्सात! एक ध्यानात ठेव हे सरकार फक्त जुमले बांधते रे, जुमले बांधते, बाकी कायी नायी करत! काय मनत जात 2022 पर्यंत आमी शेतकर्‍यायचं उत्पन्न दुप्पट करू! हे करू, ते करू, पन झालं कायीच नायी! तुले वाचता येते ना, हे घे आजचा पेपर वाचून दाखो अठी बशेल हायेत त्या सर्व्यायल! मोठ्यानं वाच सव्यायले आयकू दे!
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही!

लोकसभेत केंद्र सरकारचे धक्कादायक स्पष्टीकरण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पयर्ंत दुप्पट करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते वारंवार देत असले तरी अशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली.
अण्णा द्रमुकचे सदस्य आर. पार्थिपन यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे लेखी उत्तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी दिले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार योजना तयार करीत आहे का आणि असल्यास त्याचे स्वरूप काय आहे, असा पार्थिपन यांचा प्रश्न होता. त्यांच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी निरंजन यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

बातमी वाचताना प्रल्हाद बेरके थांबला. मान वर करून सर्वांकडे बघायला लागला.

सरपंच त्याच्याकडे बघून हसायला लागले. रामदास मानेच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

अबकी बार मोदी सरकार काय? येऊ देनं मले मत मांग्याले, मंग सांगतो एका एकाले, अबकी बार, मोदी सरकारले खड्ड्यात घाल!”
 
“संदीप अंभोरे, उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content