Homeटॉप स्टोरीसिलक्यारातल्या बचावकार्याला वेळ...

सिलक्यारातल्या बचावकार्याला वेळ लागणार?

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील 2 किमी काँक्रीटचे काम पूर्ण झाले असून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, तरीही एकंदर भौगोलिक परिस्थिती पाहता बचावकार्याला वेळ लागू शकतो, असे संबंधित यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध सरकारी यंत्रणा त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात अथकपणे गुंतल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या ठिकाणी बचाव कार्याबाबत सूचना करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.

बचावकार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती:

1. एनचआयडीसीएल लाईफलाईनचे प्रयत्न:

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • संत्री, सफरचंद, केळींसारख्या पुरेशा फळांसह औषधे आणि क्षारांचाही या पाईपमधून नियमित अंतराने पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील साठ्यासाठी अतिरिक्त सुक्या खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला जात आहे.
  • एसडीआरएफने विकसित केलेली सुधारित संपर्क व्यवस्था स्थापन करून, अडकेल्या मंजुरांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. अडकलेले सर्व कामगार सुरक्षित आहेत.

2.सतलज जल विद्युत निगम-SJVNL द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग:

  • ड्रिलिंग मशिनरी घटनास्थळी दाखल झाल्या.
  • ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय, आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
  • मशीनची जोडणी सुरू झाली आहे.
  • मुख्य मशीन ड्रिलिंग साइटवर पोहोचले आहे.बोगद्याच्या पोर्टलवरून ड्रिलिंग साइटपर्यंत मशीनची ड्रिलिंग रिग पाठवली आहे. 26.11.2023 रोजी दुपारी 12 .05 वाजता ड्रिलिंग सुरू झाले.

3.टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या बाजूला हॉरीझॉन्टल ड्रिलिंग:

  • टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, पाचवा स्फोट 26.11.2023 रोजी दुपारी 2.25 वाजता करण्यात आला.
  • ड्रिफ्टची एकूण लांबी 10.6 m आहे. 13 क्रमांकाच्या रिब्सचे फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

4.आरव्हीएनएल द्वारे हॉरीझॉन्टल ड्रिलिंग

  • कामगारांना वाचवण्यासाठी हॉरीझॉन्टल ड्रिलिंग करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत. प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.       

5.सिल्क्याराच्या बाजूने आरव्हीएनएलद्वारे व्हर्टिकल ड्रिलिंग (8 इंच व्यास)

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणिआरव्हीएनएलला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
  • 26.11.2023 रोजी पहाटे 4. 00 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 40 मीटर पूर्ण झाले.

6.ओएनजीसी द्वारे बरकोटच्या दिशेने व्हर्टिकल ड्रिलिंग (24 इंच व्यास)

  • ओएनजीसी च्या खोदकाम पथकाने 20.11.2023 रोजी साइटला भेट दिली.
  • इंदूर येथून एअर ड्रिलिंग रिग मशीन घटनास्थळी पोहोचले आहे.

7.THDCL/लष्कर/कोल इंडिया आणि NHIDCL च्या संयुक्त टीमकडून मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेलचे खोदकाम

  • ड्रिफ्ट डिझाइन पूर्ण झाले आहे (1.2 मी X 1.5 मी विभाग)
  • साहित्य घटना स्थळी पोहोचले.
  • 21.11.2023 रोजी लष्कराच्या वेल्डर्सनी फॅब्रिकेशन सुरू केले.
  • 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.

8. बीआरओद्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:

  • बीआरओ ने SJVNL आणि RVNL द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
  • ओएनजीसी द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ,ओएनजीसी साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 1050 मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी:

12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यारा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्याराच्या बाजूला 60 मीटर भागात बोगद्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरू केली.

टीप: तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे बचावकार्य लांबू शकते.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content