Homeटॉप स्टोरीतासाभरातच तामिळनाडूत विजय...

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील ‘तमिझगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सरकार स्थापनेसाठी ‘विदुथलाई चिरुथाईगल काची’ (व्हीसीके) या पक्षाने आपली अधिकृत पाठिंब्याची पत्रे सादर केल्याने विजय यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. याव्यतिरिक्त काँग्रेस (५ जागा), सीपीआय (२ जागा) आणि सीपीआय (एम) (२ जागा) यांनीही विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या राजकीय जुळवाजुळवीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या ६० वर्षांपासून असलेली द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन द्राविडी पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली असून एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्याला सरकार स्थापन करण्याची मुभा द्यावी, याकरीता विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची सहा मेपासून रोज भेट घेतली. काल अखेर त्यांनी आपल्याला असलेल्या इतर मित्रपक्षांची पत्रे सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काल सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले.

चेन्नईतील ‘जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम’मध्ये हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार असून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजय यांनी नुकतीच राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता, ज्याला आता मित्रपक्षांच्या पाठिंब्यानंतर अधिकृत बळ मिळाले आहे.

आंबेडकर, पेरियार आणि कामराज यांच्या विचारधारेवर आधारित पक्ष

अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित राजकीय गणितांना धोबीपछाड देत हे यश मिळवले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि कामराज’ यांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या टीव्हीके पक्षाने तरुणांच्या आणि महिलांच्या पाठिंब्यावर सुमारे ३४.९२% मते मिळवली आहेत. तामिळनाडूमध्ये १९६७नंतर पहिल्यांदाच एका तिसऱ्या पर्यायाला जनतेने कौल दिल्याने या ऐतिहासिक बदलाची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content