Wednesday, November 6, 2024
Homeबॅक पेजमाझी माऊली चषक...

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता

 मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ – जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतरशालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक फटक्यांची आतषबाजी करीत वेदांत राणेने प्रारंभी ७-० अशी मोठी आघाडी घेणाऱ्या आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेचे आव्हान संपुष्टात आणले.

तत्पूर्वी दैवत रंगमंच, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड-भायखळा येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेदांत राणेने सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरीच्या स्वस्तिक सुर्वेचा तर नील म्हात्रेने ससून जेकब हायस्कूल-नागपाडाच्या मयांक सोळंकीचा पराभव केला. स्पर्धेमधील उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, बाबासाहेब आंबेडकर एमपीएस-वरळीचा समीर खान, डॉ. शिरोडकर हायस्कूल-परेलचा वेदांत हळदणकर, ह्यूम हायस्कूल- नागपाडाचा आयुष पालकर यांनी जिंकला.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते अनिल घाटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन यांच्यातर्फे यंदा क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार पात्र ठरलेले नामवंत कबड्डीपटू व प्रशिक्षक अनिल घाटे यांचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा संघटक निवृत्ती देसाई, कॅरम पंच चंद्रकांत करंगुटकर, मंडळाचे पदाधिकारी कृष्णा रेणोसे, भूषण परुळेकर, अनिल शेलार, अशोक मुलकी, गौतम कांबळे, प्रमोद पाताडे यांचादेखील सत्कार करण्यात आला. .

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content