Homeटॉप स्टोरीउन्मेष पाटील ठाकरेंकडे,...

उन्मेष पाटील ठाकरेंकडे, मात्र उमेदवारी करण पवारांना!

जळगावमधून भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेल्यानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले खरे.. पण त्यांनी जळगावमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांची लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली.

भाजपाने यावेळी लोकसभेचे उमेदवार जाहीर करताना विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी डावलत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून उन्मेष पाटील अस्वस्थ होते. आज अखेर त्यांनी मुंबईत मातोश्री, या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे जळगावमधून उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर करतील, असा जाणकारांचा होरा होता. परंतु ठाकरे यांनी यावेळी करण पवार यांना जळगावची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आता करण पवार महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी लढत देतील.

याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पालघरमधून भारती कामडी, कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर-राणे तर हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमध्ये उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या उमेदवारीकरीता पाठिंबा मागितला होता. पण शेट्टी यांनी तेथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निशाणीवर निवडणूक लढविण्याची अट ठेवली. शेट्टी यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आज ठाकरे यांनी तेथे त्यांच्या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरविला.

ठाकरे

लोकसभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरे यांनी आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात चार नावांचा समावेश आहे. त्याआधी त्यांनी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्याची यादी अशी-

  1. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
  2. यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
  3. मावळ- संजोग वाघेरे-पाटील
  4. सांगली- चंद्रहार पाटील
  5. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
  6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
  7. उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर
  8. शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  9. नाशिक- राजाभाई वाजे
  10. रायगड- अनंत गीते
  11. सिंधुदूर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत
  12. ठाणे- राजन विचारे
  13. मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील
  14. मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
  15. मुंबई वायव्य- अमोल कीर्तिकर
  16. परभणी- संजय जाधव
  17. मुंबई दक्षिण-मध्य- अनिल देसाई
  18. कल्याण-डोंबिवली- वैशाली दरेकर
  19. हातकणंगले- सत्यजित पाटील
  20. जळगाव- करण पवार
  21. पालघर- भारती कामडी

Continue reading

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...
Skip to content