Saturday, July 27, 2024
Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे काळारामाचे...

उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त!

कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत, अशी टीका मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज केली. तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हानही त्यांनी ठाकरेंना दिले. 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना शेलार म्हणाले की, आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरेंनी आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी लक्ष दिले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याची पातळी उद्धव ठाकरे यांना अजून आली नाही. उद्धव ठाकरे स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील त्यांना माझा सवाल आहे उद्धवजी जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, जर तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढता, जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. मोदींचे कुटूंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वतःच्या परिवारापेक्षा देश हा परिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटूंब माझा परिवार, ही तुमची भूमिका कोठे? यासाठी तुम्ही क्लासेस लावावा. मी चाटे क्लासेसला याबाबत जरूर विनंती करेन असेही आ. शेलार म्हणाले.

शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, एकनाथ खडसे यांना तिकडे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असेल. माझी त्यांना विनंती आहे, आपण टीका जरूर करा पण त्या टीकेत तथ्य असू द्या. कालच्या घटनेचा उल्लेख केला असता शेकडो कोटींच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन विकासाला गती देणारे आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले आहे. 

महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये होईल तर उपनगरातील दुसरा मेळावा रंग शारदातील वांद्रे येथे होईल. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होईल. मुंबईतील सहाही जागा निवडून आणू यासाठी आम्ही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे असेही ते म्हणाले.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!