Homeकल्चर +थरारक 'आरडी' येतोय...

थरारक ‘आरडी’ येतोय २१ मार्चला

आयुष्य सुरळीत सुरू असताना एका धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी ‘आरडी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार असून, नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखते यांनी संगीतदिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

एका तरुणाच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते. हा तरुण त्या घटनेचा तपास मित्राच्या मदतीने करू लागतो. पुढे अजून काय घडते? याची अतिशय रंजक गोष्ट आरडी, या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरवरूनच हा चित्रपट अतिशय स्टायलीश असल्याचं जाणवत आहे. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content