Homeडेली पल्सहवाईदल उपप्रमुखांनी स्वतः...

हवाईदल उपप्रमुखांनी स्वतः घेतली स्वदेशी टर्बो ट्रेनर-40ची चाचणी! 

हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज बंगळूर येथे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) हे मुलभूत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊ शकणारे विमान स्वतः चालवून बघितले.

एचटीटी-40 हे पूर्णपणे एयरोबॅटिक प्रकारचे विमान असून, ते चार पात्यांच्या टर्बो-प्रॉप इंजिनाच्या शक्तीने सुसज्जित आहे. या विमानामध्ये अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे काचेचे कॉकपिट, आधुनिक हवाई यंत्रणा तसेच झिरो-झिरो इजेक्शन सीटसह अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविलेल्या आहेत. या प्रशिक्षण विमानाला 450 किमी प्रतितास इतका कमाल वेग गाठता येत असून जास्तीतजास्त सहा किलोमीटरचे सेवा सिलिंग आहे.

दिनांक 31 मे 2016 रोजी एचटीटी-40 या विमानाचे पहिले उड्डाण झाले आणि 06 जून 2022 रोजी या विमानाने यंत्रणा पातळीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. लष्कराच्या हवाई उपयोगासाठी बाबतच्या केंद्राकडून या विमानाला उड्डाणासाठी परवानगी आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भारतीय हवाई दलाने एचएएल कंपनीसोबत अशा 70 विमानांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, 15 सप्टेंबर 2025 ते 15 मार्च 2030 या कालावधीत हा पुरवठा होणे अपेक्षित आहे. एचटीटी-40 हे विमान भारतीय हवाई दलातील वैमानिकांच्या सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवून आणेल. या खरेदी करारामध्ये विमानाच्या हवाई प्रशिक्षणाला पूरक ठरणाऱ्या फुल मिशन सिम्युलेटर प्रणालीचा देखील समावेश आहे. या प्रणालीमुळे वैमानिकांना या विमानाची प्रत्यक्ष हवाई फेरी सुरु करण्यापूर्वी, जमिनीवर विविध पद्धतीच्या उड्डाणांचा सराव करता येईल.

एचटीटी-40 या विमानाचे विकसन म्हणजे केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अनुसरत, संरक्षण तसेच हवाई क्षेत्रांमध्ये अधिक स्वावलंबन प्राप्त करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content